विठ्ठल कारखाना चालविण्यास अभिजीत पाटील यांना मदत करणार :- संचालक , समाधान दादा काळे
पंढरपूर( प्रतिनिधी) गुरसाळे (तालुका पंढरपूर) येथील विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा विठ्ठल परिवारातील असल्याने येणाऱ्या गळीत हंगामात ऊसाचे जास्तीत जास्त उच्चांकी गाळप करण्यास सहकार्य करणार असल्याचे मत संचालक - समाधान दादा काळे यांनी व्यक्त केले.
आज दिनांक 11 सप्टेंबर 2022 रोजी संचालक मंडळाची मीटिंग आयोजित करण्यात आली होती,
या मिटिंग मध्ये अभिजीत पाटील यांनी मागील दोन वर्षापासून सभासदांचे असणारे थकित असलेले ऊस बील तातडीने सभासदाच्या खातेवर जमा केल्याने त्यांनी वचनपूर्ती करून सभासदांचा विश्वास पात्र केला आहे. त्यामुळे सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे। त्याबद्दल प्रथमता तालुक्यातील सभासदांना थकित ऊस बिल दिल्याबद्दल कारखान्याचे संचालक समाधान काळे यांनी स्वत: या मिटिंग मध्ये चेअरमन, अभिजीत पाटील यांचा सत्कार करण्याचा अभिनंदन पर ठराव मांडला . या ठरावास दिनकर चव्हाण यांनी अनुमोदन दिले. यावेळी चेअरमन अभिजीत पाटील यांचा सर्व सभासदांच्या वतीने संचालक समाधान काळे यांनी शाल श्रीफळ फेटा बांधून जंगी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास कारखान्याचे व्हॉइस चेअरमन सर्व संचालक मंडळ व कर्मचारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.