सिद्धेवाडी येथे देवीच्या नवरात्र महोत्सव सणावर डेंग्यूचे सावट ; डेंगू ने घेतला अनेकावर ताबा, गावात भीतीचे वातावरण
---------------------------------------------------------------------------------
जि. प .सदस्य व पंचायत समितीच्या सदस्या यांचेकडून साधी चौकशी नाही
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) तालुक्यातील सिध्देवाडी येथे डेंगू या साथीच्या रोगाने सध्या थैमान घातले असून डेंगू च्या आजारामुळे अनेकाच्या शरीरातील पेशीचे प्रमाण देखील कमी झाले आहे.त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. गेल्या महिन्याभरापासून डेंगूसरदृश्य ताप आणि इतर व्हायरल तापाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. याबाबत आरोग्य विभागाचे प्रशासन सुस्त असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे .उघड्यावर फुटलेल्या गटारा मधून वाहणाऱ्या घाण पाण्यामुळे सिद्धेवाडीत घाणीचे साम्राज्य वाढले आहे .गेल्या महिन्याभरापासून डेंगू सदृश्यताप आणि इतर व्हायरल तापाचे रुग्ण सातत्याने वाढत होत आहे .गावात रिकाम्या जागेमध्ये काटेरी बाभळी ,गवत आणि झाडाझुडपांचे प्रमाण वाढले आहे. शिवाय बऱ्याच ठिकाणी याचा मोठा फटका सार्वजनिक स्वच्छतेला बसत आहे. डासाचे प्रमाण वाढल्याने व डेंगू सदृश्य आजार वाढत आहेत ही बाब ग्रामपंचायतच्या निदर्शनास येताच ग्रामपंचायतीने तातडीने मशीन द्वारे फवारणी केली आहे. तरी आरोग्य विभागाने सिद्धेवाडी गावात त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांतून जोर धरीत आहे.
सध्या पंढरपूर शहर व ग्रामीण भागामध्ये रुग्णांच्या शरीरातील पेशी कमी होत असल्याचे प्रमाणात मोठ्या संख्येने झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आरोग्य खात्याने तातडीने उपायोजना करून नागरिकांचा जीव वाचवावा अशी मागणी नागरिकांतून मोठ्या प्रमाणात होत आहे. डेंगू च्या रुग्णाने शहर व ग्रामीण मधील दवाखाने हाउसफुल होत असल्याचे दिसून येत आहे. डेंगूच्या आजाराने अनवलीतील एका महिलेचा पहिला बळी गेल्याने गावात व परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.