सर्वसामान्यांच्या विकासाच्या उन्नतीचा राज्याचाअर्थसंकल्प सादर
---------------------------------------------------------------------------------
मुंबई( दै.पंढरी नगरी न्यूज) राज्याचा अर्थसंकल्प आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन २२२३-२४ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये समाजातील सर्व घटकांचा विचार करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार प्रमाणे शेतकरी सन्मान योजना आणली आहे. तसेच पिक विमा राज्य शासन भरणार आहे. महिलांसाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. यासह रोजगार निर्मिती, मूलभूत सोयी सुविधा, ग्रामीण भागातील रस्ते, महामार्ग, रेल्वेचे जाळे यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. यामध्ये पंढरपूरचा ही समावेश केला आहे. पंढरपूर - फलटण रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार निधी देणार आहे. या अर्थसंकल्पाचे स्वागत सर्वसामान्य जनता करत आहे. आजवर असा सर्व समावेशक अर्थसंकल्प कोणीही मानला नव्हता मी त्याचे स्वागत करतो.
- आमदार समाधान अवताडे, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ