उत्कर्ष सार्वजनिक वाचनालयात सोलापूर च्या कवींचा काव्य आविष्कार.

उत्कर्ष सार्वजनिक वाचनालयात  सोलापूर च्या कवींचा काव्य आविष्कार.

---------------------------------------------------------------------------------

सोलापूर (  दै.पंढरी नगरी न्यूज  ) : सोलापूर शहरातील कर्णिक नगर येथील उत्कर्ष सार्वजनिक वाचनालयात आज संध्याकाळी ५ वा.कवी संमेलन आयोजित करण्यात आले. या कवी संमेलनात सोलापूर चे ज्येष्ठ कवी श्री माधव पवार, श्री मारूती कटकधोंड, सौ रेणुका बुधारम , श्री नरेंद्र गुंडेली, श्री राम प्रभू माने, श्री राजेंद्र दंदे, या कवींचा उत्स्फूर्त सहभाग होता. सदर कवी संमेलन ज्येष्ठ लेखक, साहित्यिक स्व. लक्ष्मीनारायण बोल्ली यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आले होते.
                  
प्रमुख पाहुणे महापौर सौ श्रीकांचना यन्नम ह्या होत्या.  अध्यक्ष श्री काजळे अ. वि. हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखक श्री शरद कुमार एकबोटे यांनी अतिशय सुंदर रित्या केले. सर्व कवी, संचालक, वाचक यांचे स्वागत ग्रंथपाल यांनी केले. प्रास्ताविक श्री काजळे सर यांनी केले. श्री काजळे सर यांनी वाचनालयाचा विकास, २५ वर्षात कसा झाला हे सांगितले. वाचनालयाच्या प्रगतीचे उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.            

सर्व प्रथम महापौर श्रीकांचना यन्नम यांचा सत्कार  शाल व पुस्तक देवून करण्यात आला. माधव पवार, व इतर कवींचा ही पुस्तक भेट देवून सत्कार करण्यात आला. सर्व कवींचा  सत्कार वाचनालयाचे ज्येष्ठ आजीव सभासदांकडून करण्यात आला. सत्कार नंतर सर्व कवींनी डॉ. बोल्ली यांची एक कविता, स्वत:ची एक कविता असे दोन दोन कविता सादर केल्या. या कवितांना उपस्थित रसिकांकडून जोरात टाळ्या वाजवून प्रतिसाद देण्यात आला.. तदनंतर, उपस्थित कवींना प्रेमावर च्या कविता सादर करण्याची रसिकांकडून शिफारस करण्यात आले. सदर प्रेमाच्या कवितांनी संमेलनात आणखीनच रंगत आणली यात कवी मारूती कटकधोंड यांच्या कवितेला वन्स मोअर मिळालेसर्व रसिक मंत्रमुग्ध होवून कविता ऐकत होते. त्यामुळे रात्रीचे न ऊ कधी वाजले ते कळले देखील नाही.

सदर कार्यक्रमाला श्री पद्माकर कुलकर्णी हे उपस्थित होते. वाचनालयाचे सर्व संचालक, वाचक सभासद, कर्णिक नगर येथील ज्येष्ठ नागरिक, सोलापूर जिल्हा वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री सुरेश गायकवाड हेही उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालयाचे ग्रंथपालश्री नरसिंह मिसालोलू, लिपिक वैष्णवी स्वामी, शिपाई, प्रशांत केने यशवंत गायकवाड, वाचक श्री रमेश कंदीकटला, दिगंबर कुरापाटी, यानी विशेष प्रयत्न केले.