पंढरपूरचे तहसिलदारवर कारवाईसाठी पुणे येथे उपोषण सुरु..,

पंढरपूर न्यायालयाने आदेश देवूनही संत एकनाथ महाराज पालखी महामार्गाच्या ठेकेदाराने मुरुम उत्खनन प्रकरणी न्यायालयाने आदेश देवूनही कारवाईसाठी टाळाटाळ करणाऱ्या तहसलिदारांवर शिस्तभंग व निलंबनाची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते दादा चव्हाण्‍ यांनी पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरु केलेल्या उपोषणास चार दिवस उलटूनही अद्याप प्रशासनाने कोणतीही कारवाई केल्याने या प्रकरणातील गुढ वाढले आहे.

पैठण ते पंढरपूर या संत एकनाथ महाराज पालखी मार्गाचे रुंदीकरण करणाऱ्या कंपनीने अवैद्य मुरुम व दगड उत्खनन  केल्यामुळे ए.पी.आय.रोडवेज प्रा.लि,या कंपनीस 3 कोटी 65 लाख 66 हजार 400 व 1 कोटी 80 लाख 97 हजार इतका तर पेहे नेमतवाडी शेवते रस्ता उत्खनन प्रकरणी 39 कोटी तसेच आर.के.चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून 11 केाटी 51 लाख 7 हजार दोनशे इतकी रक्कम न्यायालयाने आदेश देवूनही वसुलीबाबत पंढरपूर तहसिलदार यांनी दिरंगाई केली आहे त्यामुळे त्यांचेवर हक्कभंग व न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी दादा चव्हाण हे विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे अमरण उपोषणास बसले आहेत.

यापुर्वी चव्हाण यांनी अशा आंदोलनातून शासनाला कोटयावधीचा महसुल मिळवून दिला आहे. त्यामुळे त्यांच्या आंदोलनामुळे कोटयावधी रुपयांचा महसुल मिळण्याची शक्यता असताना आधिकाऱ्यांकडून मात्र बोटचेपी धोरण स्विकारण्याचे कारण काय या विषयी जनेतमध्ये संभ्म अवस्था निर्माण झाली आहे. प्रशासनाने याबाबत कारवाई न केल्यास आपला हा अंतरिम लढा असल्याचे चव्हाण यांनी सांगीतलेमुळे समाजातील विविध घटकांकडून वाढता पाठिंबा मिळत आहे.