*आमदार बबनदादा शिदे यांची प्रा. मारूती जाधव यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट:-*
__________________________________________________
निमित्त:जाधव यांच्या शेतातील आंबा पिक बागेची पाहणी.
__________________________________________________
प्रतिनिधी:- महाराष्ट्रातील सहकारातले आदर्श नेतृत्व सोलापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ आमदार आशिया खंडात विक्रमी साखर उत्पादन करून नावलौकिक मिळवलेले आदर्श आमदार बबन दादा शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सेलचे प्रदेश सरचिटणीस प्रा. मारुती जाधव यांच्या पळशी येथील निवासस्थानी भेट देऊन पावसाळी हंगामात येणाऱ्या शरद वाणाच्या आंबा झाडाची पाहणी केली.
यावेळी आमदार बबन दादा शिंदे यांचा सत्कार आंबा पेटी देऊन जाधव परिवाराच्या वतीने, महावितरण चे माजी अभियंता सुब्राव जाधव, पाटील साहेब, पै.दगडू नाना जाधव, मारुती जाधव, गोरख भाऊ जाधव, बाळासाहेब शेवाळे,गोपाळ तात्या झांबरे, संजय शेवाळे सर, शिवाजी तात्या झांबरे, भीमराव पाटील, बजरंग भाऊ जाधव, अनिल कारंडे, लक्ष्मण जाधव, पंडित बागल, समाधान झांबरे, माणिक आप्पा झांबरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी आमदार बबन दादा शिंदे यांनी सहकार शेती विषया वरती मनमोकळ्या गप्पा मारल्या यावेळी ज्येष्ठ नेते अरुण घाडगे ,अरुण पाटील, धनंजय जाधव यांचा जाधव परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.तसेच आमदार बबनदादा शिंदे यांच्याकडून मारुती जाधव व सुब्राव जाधव, पाटील साहेब यांना बबन दादा शिंदे आमदारकीचा दस्तऐवज जनहित कार्याची यशोगाथा सुरेश शहा लिखित पुस्तक भेट दिले.
याप्रसंगी तुळशीदास चव्हाण, शशिकांत चव्हाण, सिताराम जाधव, अण्णासाहेब झांबरे, सचिन पवार, युवा नेते योगेश जाधव, संतोष शेवाळे, डॉ. शुभम पाटील, लखन बागल ,शिवाजी जाधव, भीम दादा जाधव, हनुमंत सावंत, बापू शिंदे विश्वतेज दादा जाधव, पृथ्वीराज जाधव, कार्तिक बापू जाधव, व पळशी ग्रामस्थ उपस्थित होते.