पंढरपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त फळबागांची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याची - चेअरमन प्रशांत परिचारक यांची मागणी..
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै. पंढरी नगरी न्युज) पंढरपूर तालुक्यात अवकाळी पावस व गारपिटीमुळे तालुक्यातील ३००० हून अधिक शेतकऱ्यांना अवकाळी चा फटका बसला असून शासनाचे सर्व नियम ,निकष बाजूला ठेवून हवालदिन झालेल्या शेतकऱ्यांच्या फळबागेचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनास केली असल्याची माहिती माजी आमदार तथा श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी दिली. अवकाळी पावसाने नुकसान ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी भेटी दरम्यान शेतकऱ्यांना सांगितले.
पंढरपूर तालुक्यात शनिवारी दुपारी झालेल्या गारपीट व वादळी पावसामुळे द्राक्ष उत्पादनाचे माहेरघर समजले जाणारे कासेगाव, मुंढेवाडी ,कोंढारकी ,चळे इत्यादी गावातील शेतकऱ्यांच्या फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ,याची दखल घेऊन माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी सदर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन नुकसान ग्रस्त फळबागांची शेतकऱ्या समवेत पाहणी केली.
यावेळी बोलताना परिचारक म्हणाले की शेतकरी आपल्या कुटुंबाप्रमाणे पिकाला जपतो मात्र ज्यावेळी हातात काहीच पैसे भरण्याची वेळ येते त्यावेळी नैसर्गिक संकटामुळे सर्व काही वाहून जाते ,शनिवारी झालेल्या पाऊस व गारपिटीमुळे हजारो शेतकऱ्यांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे ,तालुक्यातील शेतकऱ्यांचे द्राक्ष, डाळीब,मका, गहू ,पपई इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आपण शासन दरबारी हा विषय मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले ,नुकसान ग्रस्त फळबागांची पाहणी करतेवेळी पंढरपूरचे प्रांत अधिकारी गजानन गुरव, कृषी विभागाचे अधिकारी यांना त्वरित पिकाचे पंचनामा करताना पिकाची नोंद आहे का किंवा इतर नियमावर बोट न ठेवता सरसकट जागेवर कोणते पीक आहे किती नुकसान झाले आहे याचा तातडीने पंचनामा करावा अशा सूचना केले असल्याचे परिचारक यांनी सांगितले.