ज्ञानाची भूक ग्रंथालये पूर्ण करतात, -पुणे विभाग ग्रंथालयाचे अध्यक्ष :- विजय कोलते. सोलापूर येथे ग्रंथालय कर्मचारी, पदाधिकारी यांची एकदिवशीय कार्यशाळा संपन्न.
---------------------------------------------------------------------------
सोलापूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) : ग्रंथालय चालविणे म्हणजे चांगला कार्यक्रम करून चांगला संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा उत्तम मार्ग आहे. ग्रंथालयाने समाजाचा पाठिंबा घ्यावा. आंदोलन करणारा वाचक हवा. ज्ञानाची भूक असणारे लोक जोडावे. सामाजिक क्षेत्राशी जोडून घेवून ज्ञानाची भूक ग्रंथालय पूर्ण करतात. असे उदगार पुणे विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजय कोलते यांनी काढले ते सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ, सोलापूर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, श्री हिराचंद नेमचंद वाचनालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत बोलत होते. शनिवार दि. 28 सप्टेंबर 2024 रोजी किर्लोस्कर सभागृह, हिराचंद नेमचंद वाचनालय सोलापूर येथे ही कार्यशाळा संपन्न झाली.
मा. अशोक गाडेकर ग्रंथालय संचालक, मुंबई यांच्या शुभहस्ते व डॉ .गजानन कोटेवार अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ, वर्धा यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला. या वेळी बोलताना महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार यांनी आपण फार वाईट परिस्थितीतून जात आहोत. गुंतवणूक करणे सर्वांना शक्य नाही.सामान्य माणसासाठी विधायक काम करणारे ग्रंथालय आहे. संघर्ष सुरू आहे. ग्रंथालयांच्या समस्या सुटल्या पाहिजेत असे वक्तव्य यावेळी बोलताना आपल्या मनोगतात केले. प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, सोलापूर जिल्ह्यात एकमेव अभ्यासिका अत्याधुनिक आहे. जिल्हा ग्रंथालय संघाची स्वतःची इमारत महाराष्ट्रामध्ये फक्त सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाची आहे. संघाने मला पुरस्कारही दिलेला आहे.
ग्रंथालयाच्या समस्या सोडविण्यासाठी मी ग्रंथालय संचालक या नात्याने पुरेपूर प्रयत्न करीत आहे. यावेळी श्री हिराचंद नेमचंद वाचनालयाचे अध्यक्ष श्रीकांत येळेगावकर, सहाय्यक ग्रंथालय संचालिका, पुणे, श्रीमती शालिनी इंगोले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा-2024 या परीक्षेत प्रथम आलेल्या तीन विद्यार्थिनींचा, रोख रक्कम, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. दांडपट्टा खेळात विश्वविक्रम केल्याबद्दल कुमार छत्रवीर पवार यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी सार्वजनिक ग्रंथालयासाठी असणारे अभिलेख, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठां नच्या योजना, इ ग्रंथालय ग्रंथालय इत्यादी बाबतची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे, ग्रंथालय निरीक्षक प्रमोदपाटील, राम मेकले, अध्यक्ष, मराठवाडा विभाग ग्रंथालय संघ, वंदना काटकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, लातूर, प्रदीप गाडे, वरिष्ठ लिपिक, विजयकुमार पवार, गुलाबराव पाटील ,अन्सार शेख, साहेबराव शिंदे, सौ. सारिका मोरे, सौ सारिका माडेकर, गीतांजली गंभीरे दीपा नरखेडकर, राजश्री माशाळकर इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथमित्र कुंडलिक मोरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब चटे, सोहळे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातील साडेचारशे वाचनालयाचे कार्यकर्ते व सेवक यावेळी उपस्थित होते .या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंथमित्र विजयकुमार पवार कार्यवाह साहेबराव शिंदे यांच्यासह सर्व पदाधिकारी संचालक मंडळ सेवक सौ वृषाली हजारे, सौ.सारिका माडीकर ,सारिका मोरे, सौ राजश्री माशाळकर, सौ नंदा कुरले, सौ दीपा नरखेडकर यांनी सहकार्य केले. आभार अन्सार शेख यांनी मानले.