खर्डी येथील तीन युवकांना चंदनचोरी प्रकरणी अटक..
---------------------------------------------------------------------------------
खर्डीसह पंढरपूर तालुक्यात यामुळे मोठी उडाली खळबळ
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्युज) पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील तिघा संशयित आरोपींना चंदन चोरी प्रकरणी सोलापूर वन विभागाने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २० लाख रुपयाच्या चंदनासह ३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे दिनांक १८ फेब्रुवारी रोजी मंद्रूप ते कंदलगाव रस्त्यावर चंदनाची पिकप जीप मधून अवैधरीत्या वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.
त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंद्रूप ते कंदलगाव रस्त्यावर सापळा लावून विना नंबर प्लेटची पिकप जीप अडवून वन विभागाने त्याची कसून तपासणी केली असता त्यावेळी तपासणीमध्ये पिकअप जीपमध्ये १० प्लास्टिक पोत्यांमधून चंदनाची लाकडे मिळून आली.या लाकडाचे वजन केले असा २० किलो वजनाची लाकडे मिळून आली पिकअप जीप मधील तिघांना वन विभागाने ताब्यात घेतले असून खर्डी ता.पंढरपूर येथील शिराप्पा परशुराम भोसले ,परशुराम हुबळी भोसले ,रमेश चन्नाप्पा भोसले सर्वजण रा .घाडगे वस्ती खर्डी ता.पंढरपूर अशी अटक करण्यात आलेल्या चंदन चोरांची नावे आहेत.
या कारवाईत २० लाख रुपये किमतीची चंदनाची लाकडे पिकप जीप असा ३०लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ,याबाबत वनअधि नियमानुसार वन गुन्हा दाखल करण्यात आला असून वनपाल शशिकांत सावंत हे तपास करीत आहेत, ही कामगिरी उपवन संरक्षक धैर्यर्शील पाटील ,सहाय्यक वनसंरक्षक लक्ष्मण आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक खलाणे ,शशिकांत सावंत ,शंकर कुटाटे ,तुकाराम बादणे ,वनरक्षक नीता शिंदे ,अनिता शिंदे, गंगाधर कनवस, कृष्णा निरवणे ,आनंद भडकवाड, नितीन सराटे यांनी केली .