धक्कादायक! सोलापूरमध्ये तरुणाचा धारदार शस्त्राने खून; तळे हिप्परगा येथील घटना..
__________________________________________________
पंढरपूर प्रतिनिधी:- सोलापूर-तुळजापूर रोडवरील तळे हिप्परगा इथल्या शीख शिकलगार वस्तीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
यामध्ये आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.
रवीसिंग सिसपाल सिंग टाक असे मृत तरुणाचे नाव आहे. धारदार शस्त्राने त्याच्या छातीवर वार करून त्याची हत्या करण्यात आली आहे. यानंतर रवीसिंगला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या अगोदरच रवीसिंगचा मृत्यू झाला होता. रवीसिंग याचे मारेकरी हे त्यांच्याच वस्तीतील असल्याचे समोर आले आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.