सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांचेवतीने नवराञोत्सव निमित्त महाप्रसादाचे वाटप..

सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांचेवतीने नवराञोत्सव निमित्त महाप्रसादाचे वाटप..

-----------------------------------------------------------------------------------

पंढरपुर (प्रतिनिधी) दि.03  मधुकरराव शिंदे क्रिडा मंडळ व शिवशक्ती युवा प्रतिष्ठान देवडे येथील नवरात्रोत्सवानिमित्त देवीची पुजा व महाआरती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सहकार शिरोमणीचे चेअरमन मा.कल्याणराव काळेसाहेब यांचे शुभहस्ते करण्यात आली..

शारदीय नवरात्रोत्सव निमित्त  भाविक भक्तांना, ग्रामस्थांना सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांचे वतीने आज खिचडी व महाप्रसादाचे वाटपाचे आयोजन करण्यात आले.
मधुकरराव शिंदे क्रिडा मंडळ व शिवशक्ती युवा प्रतिष्ठान देवडे मंडळाच्या व ग्रामस्थांच्यावतीने सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे साहेब यांचा सत्कार सोसायटी चेअरमन हरीभाऊ शिंदे या़चे  शुभहस्ते करण्यात आला....

यावेळी चेअरमन कल्याणराव काळे म्हणाले की...सध्या नवरात्रोत्सव सुरु असून त्यामाध्यमातून मंडळाच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजामध्ये एक आदर्श निर्माण केलेला आहे...मंडळाने असेच सामाजिक कर्यक्रम घेवुन  नावलौकीक करावे असे काळे यांनी सांगीतले..

याप्रसंगी नारायण शिंदे, अरून नलवडे, दत्ता झांबरे, ज्ञानेश्ववर झांबरे, मधुकरराव शिंदे क्रिडा मंडळ व शिवशक्ती युवा प्रतिष्ठान देवडे मंडळाचे अध्यक्ष भारत कडलासकर, गणेश शिंदे, रामा मोरे, हरीदास शिंदे,संतोष कडलासकर, राजेंद्र गायकवाड,रामभाऊ झांबरे,रामचंद्र मोरे, बाळासाहेब शिंदे यांचेसह शिंदे,पाटील, कडलासकर,झांबरे पाटील परिवारातील सर्व सदस्य,  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते....