पंढरपुरात 25 एप्रिल जागतिक हिवताप दिना निमित्त जनजागरण व विविध स्पर्धेचे आयोजन

पंढरपुरात 25 एप्रिल जागतिक हिवताप दिना निमित्त जनजागरण व विविध स्पर्धेचे आयोजन

---------------------------------------------------------------------------------

सोलापूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) सोलापूर जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय यांच्या वतीने, जिल्हा हिवताप कार्यालय पंढरपूर, अंतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैदयकीय अधीक्षक,वैदयकीय अधिकारी यांच्याही मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, सर्व आरोग्य उपकेंद्र या ठिकाणी 25 एप्रिल जागतिक हिवताप दिन जनजागरण कार्यक्रम सर्वांनी अतिशय उत्कृष्टपणे रॅली काढून, निबंध स्पर्धा, रांगोळी इ. स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.

 

यामध्ये सर्व आरोग्य आरोग्य पर्यवेक्षक,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी,आरोग्य सहाय्यक,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका, समुदाय आरोग्य अधिकारी, सर्व आशाताई आणि आपले क्षेत्रीय कर्मचारी आणि इतर कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन,अतिशय चांगल्या प्रकारे नागरिकांना हिवतापाविषयी लक्षणे ,प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचार याविषयी विविध माध्यमातून माहिती सांगितली . 

असेच चांगल्या प्रकारे कामकाज सुरू ठेवून आपल्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांना कीटकजन्य आजारापासून संरक्षित करू या असे सांगितले. यावेळी सोलापूर जिल्हा हिवताप अधिकारी विजय बागल यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला .शेवटी सोलापूर जिल्हा हिवताप कार्यालय अधिकारी यांच्या वतीने सर्व उपस्थिताचे आभार मानले.