*कासार शिरशी पोलीस स्टेशनच्या गणेश विसर्जन मिरवणुकी त पोलीस कर्मचाऱ्यां मधील कलाविष्का राचे उत्कृष्ट सादरीकरण*
प्रतिनिधी चंद्रशेखर केंगार
कासार शिरसी पोलीस स्टेशनमध्ये यावर्षी प्रथमच बसवण्याचा आलेल्या गणरायाचे नव्या दिवशी अत्यंत उत्साहात विसर्जन करण्यात आले यानिमित्त दररोज गणरायांची विधिवत आरती करण्यात येत होती आज शेवटच्या दिवशी येथील पोलीस कर्मचारी रवी कांबळे व बोंग यांच्या हस्ते स पत्नी श्रींची महाआरती करण्यात आली
कोविड आजारामुळे गेली दोन वर्षापासून बंद असलेला गणेशोत्सव यावर्षी सर्वच ठिकाणी अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला या आनंदोत्सवात पोलीस मागे नाहीत हे येथील पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस सुद्धा सामाजिक आनंद उत्सवात समरस होतात हे सिद्ध करत एक संघ समाज व्यवस्थेचा संदेश दिला
यानिमित्त काढण्यात आलेल्या श्रींच्या विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीच्या तालावर येथील पोलीस कर्मचाऱ्यांसह महिला कर्मचाऱ्यांनी बेधुंद पणे स्वतःतील सुप्त कलेचा अविष्कार सादर केला या त शहरातील गणेश मंडळाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते व्यापारी मोठ्या संख्येने हजर होते यासाठी निलंगा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश कोल्हे एपीआय रेवणनाथ डमाळे उपनिरीक्षक गजानन क्षिरसागर हजर होते ढमाले यांच्या हस्ते येथील तळ्यात श्री चे विसर्जन करण्यात आले महाप्रसादाने या उत्सवाची सांगता करण्यात आली आज संपन्न होणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी शांतता व सुव्यवस्थेसाठी येथील पोलीस प्रशासन आता पुन्हा सज्ज झाले आहे