चेअरमन अभिजीत पाटलांची क्रेज मतदारात झाली कमी तर भगीरथ भालके तुतारीच्या वासावर.. पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघातून कोणाला मिळणार उमेदवारीची उत्सुकता लागली
------------------------------------------------------------------------------------
पंढरपुर (दै.पंढरी नगरी न्यूज ) कॉंग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना लोकसभेत दिलेल्या पाठिंब्यामुळे आता पंढरपुर-मंगळवेढा विधानसभेसाठी मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ताब्यात असलेल्या याच मतदारसंघातून आता अनेक इच्छूक उमेदवारांनी आपली इच्छा उघडपणे व्यक्त करून दाखवली आहे.मात्र मध्यंतरी घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर आता राजकीय चित्र देखील बदललं आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत याठिकाणांहून कोण बाजी मारणार ? त्याची उत्सुकता आता लागून राहिली आहे.
सलग तिसऱ्यांदा आमदार राहिलेल्या भारत भालके यांचं २०२० साली निधन झालं. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी भारत भालके यांचे सुपुत्र तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भगिरथ भालके यांचा साडेतीन हजार मतांनी पराभव झाला. यानंतर भगिरथ भालके यांचा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत देखील पराभव झाला. यानंतर विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे नाराज झालेल्या भगिरथ भालके यांनी मग बीआरएस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला.
परंतु तेलंगणामध्ये बीआरएस पक्षाचा पराभव झाल्याने भालके पुन्हा महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. यातच अलिकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भालके यांनी कॉंग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा प्रचार केला. याच ठिकाणांहून प्रणिती शिंदे यांना तब्बल ४५ हजार ४२० मतांचं लीड मिळालं. त्यामुळे भगिरथ भालके यांना आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यात येईल. अशी चर्चा सुरू आहे.
दरम्यान, या आधी पंढरपुर- मंगळवेढा मतदारसंघातून अभिजित पाटील यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत कारखान्यावरील झालेली कारवाई मागे घ्यावी यासाठी अभिजित पाटलांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र सोलापुर आणि माढा मतदारसंघातील भाजपच्या दोन्ही उमेदवारांना पराभवाचा सामाना करावा लागला. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटलांच्या पक्ष बदलामुळे माढा व पंढरपूर या मतदारसंघातील मतदारांमध्ये अभिजीत पाटलांची पसंदीची क्रेज सर्व सामान्य, शेतकरी ,सभासद यांच्यामध्ये कमी झाल्याचे दिसून येत असल्याची चर्चा सुज्ञ मतदारात होते त्यांना आता इकडे आड तिकडे विहीर असा राजकीय बाका प्रसंग निर्माण झाला आहे. यातच आता काही महिन्यांवर होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत अभिजित पाटील पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करण्याचे धाडस दाखवणार का ? अन् जर आलेच तर शरद पवार गटाकडून भगिरथ भालके की अभिजित पाटील कुणाला उमेदवारी मिळणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.