मारापूरची कु. स्नेहल जानकर हिने इ. आठवीच्या राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीमध्ये यश संपादन ◼️ मारापुरसह पंचक्रोशीत पालक व विद्यार्थी -विद्यार्थीनी मध्ये उत्साहाचे वातावरण

मारापूरची कु. स्नेहल जानकर  हिने इ. आठवीच्या  राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीमध्ये यश संपादन   ◼️ मारापुरसह पंचक्रोशीत  पालक व विद्यार्थी -विद्यार्थीनी मध्ये उत्साहाचे वातावरण

------------------------------------------------------------------------------------

मंगळवेढा( दै. पंढरी नगरी न्यू) मंगळवेढा तालुक्यातील मारापुर येथील दादा जानकर - गुरूजी यांची कन्या कु.हर्षदा दादा जानकर हिने घेण्यात आलेल्या इ.आठवी च्या राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये घवघवीत यश संपादन मारापुर ग्रामपंचायतीच्या वतीने कार्यालयात लोकनियुक्त सरपंच विनायक माधवराव यादव यांच्या हस्ते सन्मान पर विशेष सत्कार करण्यात आला. तसेच ग्रामपंचायत च्या वतीने मागील तीन वर्षापासून मारापुर गावामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण असे यश मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांच्याकडून केला जातो व त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप दिली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होते.

या सत्काराच्या कार्यक्रमासाठी उपसरपंच अशोक आसबे सर, अभिमान जानकर, संजय यादव, डॉ.सत्यवान यादव, बालाजी यादव, संतोष यादव, अनिल माने, दादा जानकर, संतोष गांडुळे, पिंटू मांडवे, सिद्धनाथ माने इ. ग्रामस्थ ,विद्यार्थी ,विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.