जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये माहिती अधिकार फलक लावावेत= तालुका अध्यक्ष संभाजी गाजरे

जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये माहिती अधिकार फलक लावावेत= तालुका अध्यक्ष संभाजी गाजरे

----------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर;(प्रतिनिधी):-सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जन माहिती अधिकार फलक लावण्याची मागणी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास या संघटनेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष संभाजी गाजरे यांनी पंढरपूरचे तहसीलदार व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

आपल्या देशात माहिती अधिकारी कायदा १२ऑक्टो.२००५रोजी लागू करण्यात आला .त्यात नागरिकांना माहितीचा अधिकार सनद तयार करून देण्यात आली. त्यात कार्यालयातील कामाची कार्यवाही व नागरिकांना एखाद्या कामाच्या संदर्भात दिले अर्ज तो किती दिवसात मिळेल दिलेल्या अर्ज शुल्क इ. बाबी स्वतः जाहीर करणे आवश्यक आहे .असे निवेदनात म्हटले आहे. परंतु जिल्ह्यातील ग्रामपंचायत मध्ये नागरीकांच्या माहितीचा अधिकार फलक लावणे बंधनकारक असून तो अधिकार ग्रामपंचायतीनी वाऱ्यावर सोडलेचे दिसत असल्याचे सांगितले.

त्याकरिता आमच्या संघटनेच्या वतीने याकरिता नागरिकांना माहितीचा अधिकार समजण्यासाठी जनजागृती करण्यासाठी २ ऑक्टो.ते १२ ऑक्टो. या राष्ट्रीय माहिती अधिकार दिनी या सप्ताहात जनजागृती व  झोपी गेलेल्या प्रशासनास जागृती करणार आहे .जन माहिती अधिकाऱ्यासंबंधीचे फलक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लावले नसल्याने नागरिकांना अनेक ठिकाणी आपली महत्त्वाची कामे होत नसल्याने अडचणी निर्माण होत असून त्या संदर्भात त्यांचा हक्क हिरावून घेत असल्याचे निदर्शनात येत आहे. वरील बाबीची अंमलबजावणी झाली नसल्याने नागरिकांमध्ये यासंदर्भात संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे.

नागरिकांना माहितीच्या अधिकार सनद माहिती होण्याकरिता जन माहिती अधिकाराचा फलक १२ऑ. पर्यंत त्वरित ग्रामपंचायत कार्यामध्ये लावण्याचे आदेश संबंधित ग्रामपंचायतीला आदेश देण्यात यावेत अन्यथा ग्रामपंचायत मध्ये फलक न लावल्यास आपले कार्यालयासमोर १३ ऑक्टो२०२२रोजी एक दिवशी संघटनेचे पदाधिकारी व नागरिकांना सोबत घेऊन उपोषण करण्यात येईल असा कडक इशारा पद्मभूषण डॉ. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास या संघटनेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष संभाजी गाजरे यांनी  दिला आहे.