*कासार शिरशी सह ६८ गावे भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून जाहीर करा - नागरीकांची मागणी*
__________________________________________________
प्रतिनिधी:- चंद्रकांत केंगारे
कासार शिरशी पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या हासुरी गावात जमिनीतून येणारा गूड आवाज हा भूकंप सदृश्य असल्याचा निर्वाळा दिल्ली येथील वैज्ञानिकांनी दिल्याने या परिसरातील नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली असून किल्लारीच्या भूकंपाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शासनाने आत्ताच या परिसरात गावागावातील दगड मातीची घरे उतरवणे व त्यांच्या पुनर्बांधणीसाठी मदत सानुग्रह अनुदान किंवा कर्ज उपलब्ध करून द्यावे व भविष्यात उद्भवणाऱ्या आपत्तीचा सामना करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
मागील तीस वर्षांपूर्वी किल्लारी ला झालेला महाप्रयंकारी भुकंप व त्यानंतर आता लातूर जिल्ह्याच्या दक्षिणेकडून वाहणाऱ्या तेरणा नदीपात्रासह माकणी धरण या नदीपात्राखाली भूगर्भात फॉल्टी लाईन आहे. असा निष्कर्ष मानला जात असून हसूरीसह कासार शिरशी चा परिसर पूर्वी किल्लारी भूकंपाचे केंद्रबिंदू असलेल्या अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर आहे. तब्बल ३० ते ३५ वर्षानंतर आता या भागात पुन्हा भूकंपाचे वारंवार सौम्य धक्के जाणवत असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण आहे. हासुरी हे भूकंपाचा केंद्रबिंदू मानला जात आहे भविष्यात नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास याचा फटका परिसरातील ६८ गावात बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कासार शिरशी च्या परिसरात संपूर्ण गावात दगडमातींची जुनी वाडे गडी घरे आहेत हे बांधकाम १०० ते १५० वर्षांपूर्वीची असून ही संपूर्ण वाडे आज असुरक्षित आहेत. या भागातील नागरिकांना इतर समुपदेशनासह दगड मातीची घरे त्वरित उतरवणे ती तज्ञांच्या मते बांधकाम करणे यासाठी शासनाने या भागात नैसर्गिक आपत्ती उद्भवणे अगोदरच अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावे अन्यथा भविष्यात वित्तहानी झाल्यावर विश्वबंधुत्वाची भावना दाखवण्यात काय अर्थ आहे असा सवाल या भागातील नागरिकांतून करण्यात येत आहे.