श्री. करी बसवेश्वर विद्यालयात विधवा महिलेच्या हस्ते ध्वजावतरण
__________________________________
*लातूर,(प्रतिनिधी):-*
कासार शिरसी येथील दिवंगत स्वातंत्र्यसैनिक कै. वीरभद्रआप्पा शीलवंत यांच्या पत्नी श्रीमती निलगंगा वीरभद्रआप्पा शिलवंत यांच्या हस्ते कासार शिरसी येथील श्री. करी बसवेश्वर विद्यालय प्राचार्य सौ. सविता मुरूमकर यांच्या उपस्थितीत मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला.याप्रसंगी प्रशालेच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले. या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त वर्षभर राबवण्यात येणाऱ्या 75 व्या अमृत महोत्सवाची सुरुवात विविध उपक्रमाने कासार शिरशीसह या परिसरात करण्यात आली.या निमित्त येथील श्री. करीबसवेश्वर विद्यालयात दिवंगत स्वातंत्र्यसैनिकांची पत्नी श्रीमती निलंगंगा वीरभद्रआप्पा शिलवंत यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला.
याप्रसंगी शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव दिवंगत कै. बाबुरावकाका चिंचनसुरे, उपाध्यक्ष कै.पंडितराव मुळसकर यांच्या प्रतिमेचे सचिव शिवदर्शन चिंचनसुरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या समारंभास सर्वेक्षक बिराजदार,उपाध्यक्ष गिरीश चिंचनसुरे, यांच्यासह विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने हजर होते.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त अनेक ठिकाणी शासकीय कार्यालयात ध्वजवंदन करण्यात आले. येथील ग्रामपंचायत कार्यालयात दिपाली पांचाळ तर शिवाजी चौकात दिवंगत स्वातंत्र्य सैनिकाचे पुत्र यांच्या हस्ते येथील जि. प. कन्या शाळा, बँका, विकास सोसायटी या ठिकाणीही संस्थाप्रमुखांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आले.