*सह. शि .वसंतराव काळे कारखान्यावर जप्तीची नोटीस म्हणजे संस्थेला बदनाम करण्याचा प्रकार:- चेअरमन कल्याणराव काळे यांची माहिती..*
----------------------------------------------------------------------------
सोलापूर(प्रतिनिधी):-
महाराष्ट्र शासनाच्या संलग्न असलेल्या राज्य सहकारी शिखर बँकेने पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि. चंद्रभागा या कारखान्यावर जप्तीची कारवाई ची चर्चा म्हणजे संस्थेला बदनाम करण्याचा प्रकार असल्याचे या कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी सांगितले कारखान्यावर कारवाई करण्यासंदर्भात आदेश काढले होते. परंतु कर्जाच्या हप्त्याचे कारखान्याकडून 50 लाख रुपये बँकेकडे भरण्यात आली आहे. त्यामुळे सध्या तरी कारवाई टाळी आहे. अशा आशयाची बातमी काही वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पंढरपूर येथील नेते तथा वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना या संस्थेचे कल्याणराव काळे हे चेअरमन आहेत. वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याने शासनाच्या राज्य शिखर बँकेकडून कर्ज घेतले आहे. या साखर कारखान्याला गेल्यावर्षी महाराष्ट्र शासनाकडून थक हमी मिळाली होती. परंतु बँकेकडून वारंवार सूचना देऊन साखर कारखाने कर्जाची थकीत रक्कम भरली नाही कर्जाचे एक कोटी रुपये थकल्यामुळे राज्य बॅंकेने कारवाईची प्रक्रिया सुरू केली होती. यासंदर्भात राज्य शिखर बँकेने कारखान्यावर जप्तीची कारवाई कार्यवाही करण्याचे आदेश काढले होते. शुक्रवारी कारखान्यावर जप्तीची कारवाईची शक्यता होती. परंतु त्या अगोदरच कारखाना प्रशासनाने बँकेकडे एक कोटी रुपयाचा हप्ता बँकेकडे भरला असल्याचे कारखाना प्रशासकडून सांगण्यात आले .वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याला राज्य शिखर बँकेकडून रीतसर कर्ज घेतले होते. घेतलेल्या कर्जाचे हप्ते पाळून देण्यात आले होते .परंतु घेतलेले कर्ज बँकेच्या धोरणानुसार पाडून दिलेल्या हप्त्याप्रमाणे वेळोवेळी बँकेकडे भरल्याने कारखान्यावर शिखर बँकेची जप्तीची नोटीसची कारवाई होणार अशी माहिती चुकीची व खोटी माहिती असल्याने काही विरोधक मंडळी बिनकामाची संस्थेची या संदर्भात बदनामी करून दिशाभूल करीतअसल्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी सांगितले.