सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! LPG गॅस सिलिंडर झाले इतक्या रूपयांनी स्वस्त..

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! LPG गॅस सिलिंडर झाले इतक्या रूपयांनी स्वस्त..

----------------------------------------------------------------------------------

पंढरपूर; (प्रतिनिधी) /- सरकारने गॅस सिलिंडर ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. माहितीनुसार, शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 पासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. पण एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

त्यामुळे व्यावसायिक एलपीजी सिलिंडर ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.

IOCL वेबसाइटनुसार, 1 ऑक्टोबरपासून राष्ट्रीय राजधानी दिल्लीत इंडेनच्या 19 किलोग्रॅमच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 25.5 रुपयांनी, कोलकात्यात 36.5 रुपयांनी, मुंबईत 32.5 रुपयांनी, चेन्नईमध्ये 35.5 रुपयांनी कमी झाली आहे. त्याच वेळी, 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर त्याच जुन्या किमतीत मिळेल.

LPG ची आजची किंमत 1 ऑक्टोबर 2022- 14.2 KG सिलेंडरची किंमत

कोलकाता: 1079 रुपये प्रति सिलेंडर

दिल्ली: 1053 रुपये प्रति सिलेंडर

मुंबई: 1052.5 रुपये प्रति सिलेंडर

चेन्नई: 1068.5 रुपये प्रति सिलेंडर

LPG ची आजची किंमत 1 ऑक्टोबर 2022- 17 KG सिलेंडरची किंमत

कोलकाता: 1959 रुपये प्रति सिलेंडर (मागील महिन्याची किंमत 1995.50 रुपये)

दिल्ली: 1859.5 रुपये प्रति सिलेंडर (मागील महिन्याची किंमत 1885 रुपये)

मुंबई: 1811.5 रुपये प्रति सिलेंडर (मागील महिन्याची किंमत 1844 रुपये)

चेन्नई: 2009.50 रुपये प्रति सिलेंडर (मागील महिन्याची किंमत 2045 रुपये)

सरकारी तेल कंपन्या दर महिन्याला किमतींचा आढावा घेतात. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीनुसार किंमती वाढतात किंवा कमी होतात. सिलिंडरचे दर कमी होण्याची ही सहावी वेळ आहे.