शेतकऱ्याचा पांडुरंग असणाऱ्या कारखान्याला टार्गेट कशासाठी - शेतकरी सभासद वर्गामधून चर्चा
-----------------------------------------------------------------------------------
पंढरपूर;( दै.पंढरी - नगरी न्यूज ) : माळशिरस तालुक्यातील श्रीपुर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाने जिल्ह्यातील साखर कारखानदारीत सभासदांच्या हिताला पहिले प्राधान्य देऊन त्यांचे हित जोपासले असून शेतकऱ्यांच्या उसाला सर्वाधिक दर देणाऱ्या श्रीपुर चा पांडुरंग कारखान्याचा पहिला नंबर लागत असून उसाला जादा दर दिला आहे .मग शेतकऱ्यांच्या उसाला सर्वाधिक दर देणाऱ्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या उसाचे वाहतूक करणाऱ्या वाहनाचे टायर फोडण्यात ऊस दर संघर्ष समितीने याच कारखान्यालाच का ?बरे लक्ष केले जात असल्याचे संबंध पंढरपूर तालुका व श्रीपुर परिसरातील शेतकऱ्यांमधून विषयी शेतकऱ्यांमधून नाराजीची चर्चा झडू लागली आहे .
शेतकऱ्यांच्या उसाला घामाचे दाम योग्य मिळण्यासाठी पंढरपुरात सर्वपक्षीय शेतकरी संघटनेने ऊस दर संघर्ष समितीची नुकती स्थापना करून रणसिंग फुकले आहे .ऊस दर संघर्ष समितीने गेले चार-पाच दिवस ऊसाला दर मिळावा याकरिता संघटनेचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन ऊस उत्पादक शेतकरी यांच्या फड ऊस मालकांना विनंती करून ऊसतोड थांबवण्याचे आवाहन गांधीगिरी मार्गाने आपले आंदोलन सुरू केले होते या आंदोलनाला संपूर्ण ग्रामीण भागातील शेतकऱ्याकडून प्रतिसाद ही मिळत होता .परंत जिल्ह्यामध्ये सर्वाधिक दर देणाऱ्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे उसाचे गाळप ही सध्या व्यवस्थित सुरू आहे. या कारखान्याने शेतकऱ्यांच्या उसाला पहिल्यांदा जिल्ह्यात सर्वाधिक ज्यादा दर देण्याची घोषणा केली आहे.
शेतकऱ्यांचा राजवाडा समजल्या जाणाऱ्या व विश्वासास पात्र असलेल्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकरी व कामगार यांना प्रत्येक पंधरवाडा मस्टर ला शेतकऱ्यांची उसाची रक्कम व कामगारांचे पगार वेळोवेळी अदा केले असून या कारखान्याच्या व्यवस्थापकाकडून अत्यंत आर्थिक काटकसरीने नियोजन केले जाते. त्यामुळे कारखान्याच्या सभासद शेतकऱ्याला ज्यादा दर मिळत आहे अशीही चर्चा शेतकऱ्यांमधून होत आहे.
पांडुरंग सहकारी साखर कारखाना जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही संस्था आदर्शवत ठरली जात आहे सहकारातले डॉ.समजले जाणारे स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांनी आपल्या शेतकऱ्याला संस्थेचा फायदा मिळण्याकरता ही संस्था आर्थिक दृष्ट्या काटकसरीचे धोरण स्वीकारून चांगली नावारूपास आणल्याने कारखान्यास देश व राज्य पातळीवरील देण्यात येणारे अनेक नामांकित पुरस्काराने आज पर्यंत सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सहकारात मुरब्बी व आर्थिक काटकसरीचे धोरण स्वीकारून स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांचे पुतणे तथा सोलापूर विधान परिषद मतदार संघाचे माजी आमदार या कारखान्याचे विद्यमान चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करून महाराष्ट्रात या संस्थेचा आदर्श निर्माण केला आहे .
या कारखान्याने प्रत्येक वर्षी गाळपाचे नियोजन अत्यंत काटकसरीचे केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाला ज्यादा दर मिळत आहे अशीही चर्चा पांडुरंग च्या सभासदांमधून होत आहे. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापकाचे नेटके नियोजन व आर्थिक काटकसर करीत असताना नेमकी माशी कुठे शिकली असा प्रश्न सभासद शेतकऱ्यांमधून केला जात आहे. काल बुधवार दिनांक २६ रोजी चळे आंबे येथून पांडुरंग सहकारी साखर कारखान्याची दवाहने ऊस भरून पंढरपूर येथील वाखरी येथे थोरात यांच्या पेट्रोल पंपा समोर अडवून शेतकऱ्यांच्या उसाचे व वाहन मालकांचे ट्रॅक्टरचे १२ टायर ऊस दर संघर्ष समितीच्या अज्ञात कार्यकर्त्यांनी फोडल्याने वाहन मालक व शेतकरी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान यशस्वी झाले आहे .
मुळातच श्रीपुर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखाना सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदा सर्वाधिक ऊस दर जाहीर करण्यात आज पर्यंत आघाडीवर असल्याचे सभासदांमधून चर्चा होत आहे. शेतकऱ्यांचे हित जोपासणाऱ्या कारखान्याच्या वाहतूक यंत्रणेला रोखून धरण्याचा उद्देश काय ?असा सवाल सभासद शेतकरी वर्गांमधून होत आहे.