पुरोगामी महाराष्ट्रात पहिले स्त्री शिक्षणाचा पाया पुरवणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी रोवला, --, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अशोक गवळी यांचे मत

पुरोगामी महाराष्ट्रात  पहिले स्त्री शिक्षणाचा पाया पुरवणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी रोवला,  --, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  अशोक गवळी यांचे मत

-----------------------------------------------------------------------------------

बार्शी (दै.पंढरी नगरी न्यूज ): महाराष्ट्रात पहिला शिक्षणाचा पाया रोवणारे क्रांतिकारक पाऊल उचलणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात थोर समाजसुधारक,क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते . 

यावेळी क्रांतीसुर्य म.फुले त्यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त ग्रंथपाल अशोक गवळी यांचे शुभहस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाचे अध्यक्षपदी ग्रंथालयाचे कार्यवाह मधुकांत ठोकळ हे होते.यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुहासबप्पा सुतार,गायक सुनिल फल्ले, भागवत बोबडे साहेब, शाम जानराव, राहुल लोंढे, अश्वस्त गुरव यांचेसह सभासद व वाचक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक ग्रंथपाल विनोद गायकवाड यांनी व्यक्त केले.