शेवरे येथे कायदेशीर सहाय्य शिबीर संपन्न....

शेवरे येथे कायदेशीर सहाय्य शिबीर संपन्न....

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) शेवरे गाव येथे कायदेशीर सहाय्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा मुख्य उद्देश ग्रामस्थांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करणे व त्यांना त्यांच्या हक्कांची माहिती देणे हा होता.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११.०० वाजता झाली.या कार्यक्रमाचे आयोजन पंढरपूर येथील कर्मवीर औदुंबर पाटील लॉ कॉलेजच्या प्राचार्य सुरांजली सोनकांबळे व प्राध्यापिका भक्ती दुधाते यांचा मार्गदर्शनामध्ये करण्यात आले होते.उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. या शिबिरात विविध कायदे विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः महिलांचे हक्क, बालविवाह प्रतिबंध, घरगुती हिंसाचार कायदा, तसेच नागरिकांचे मूलभूत अधिकार यांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.

तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, लहान वयात विवाह न करण्याचे फायदे आणि स्वतःच्या हक्कांबद्दल जागरूक राहण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामस्थांनी या शिबिरात उत्साहाने सहभाग घेतला आणि विविध प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतले.

कार्यक्रमादरम्यान कायद्याचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण देण्यात आले, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही ते समजण्यास सोपे गेले.

या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले ते अ‍ॅड. भारत मस्के माजी विद्यार्थी यांचे तसेच माजी सरपंच मस्के यांचे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. शेवटी उपस्थीत सर्व मान्यवरांचे व ग्रामस्थांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. आभार प्रविण मुळे यांनी मानले.