सिताराम महाराज साखर कारखान्याचा अग्निपदीपन कार्यक्रम संपन्न..
सिताराम महाराज साखर कारखान्याचा अग्निपदीपन कार्यक्रम संपन्न..
पंढरपूर (प्रतिनिधी) खर्डी येथील सिताराम महाराज साखर कारखाना सन 2022- 23 गळीत हंगामाचा बॉयलर आणि अग्निप्रदीपन समारंभ ह.भ.प.जयवंतराव बोधले महाराज यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरपूरचे तहसीलदार उपस्थित होते..
यावेळी कार्यक्रमास धनश्री परिवाराचे प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे सर श्री संत दामाजी कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील गोकुळ शुगर चेअरमन दत्तात्रय शिंदे धनश्री मल्टीस्टेट चेअरमन शोभाताई काळुंगे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची संचालक समाधान दादा काळे सिताराम साखर कारखान्याची माजी चेअरमन गणेश ठिगळे, संचालक महादेव देठे, सुयोग गायकवाड, रविकांत पटील, मंगळवेढा पंचायत समितीचे उपसभापती रमेश भांजे,प्रा.मारुती जाधव हनुमंत पाटील उपस्थित होते.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी अधिकारी राजलक्ष्मी गायकवाड यांनी सांगीतले की, सन 2022-23 या गळीत हंगामात साडेपाच लाखाचे गाळपाचे उद्दिष्ट असून दहा मेगावॅट सहवीस निर्मिती प्रकल्पातून तीन कोटी युनिट वीज तयार करण्यात येणार असून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतःचे काम चांगले करून स्वतःचा पगार वाढ करुन घ्यावा असे प्रोत्साहन पर सांगितले..
सिताराम महाराज साखर कारखान्याने सन 20 21 या गळीत हंगामात ऊस घातलेल्या शेतकऱ्यांना ऊस ऊस बीले, तोडणी वाहतूक बीले अदा केली असून कर्मचारी पगार वेळेवर खात्यावर जमा करून शेतकऱ्यांचा विश्वासास पात्र असल्याचे सांगितले. यावेळी ह,भ,प .जयवंतराव बोधले महाराज म्हणाले की सिताराम महाराज साखर कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी या महिला असून मागील गळीत हंगामात उच्चांकी ऊसाचे गाळप करून कारखाना अतिशय उत्तम व चांगल्या प्रकारे चालवला असून त्यांचे कौतुक केले. तसेच एका वर्षामध्ये कारखान्याने चांगल्या प्रकारे चालवून नावारूपास आणले असे गौरवउद्गार काढले.
यावेळी कार्यक्रमास जनरल मॅनेजर सूर्यकांत पाटील शेती अधिकारी पी.जी शिंदे डी.एम रोकडे चिप.केमिस्ट व्ही.एस नागणे परचेस अधिकारी चेळेकर प्रशासन अधिकारी डी.एम. सुतार यांचे सह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते