सांगोला पोलीसांची चमकदार कामगिरी ◼️ दरोड्याच्या गुन्ह्यातील ४ आरोपीतांना २४ तासाच्या आत अटक :,पोलीस निरीक्षक विनोद घुगे
------------------------------------------------------------------------------------
सांगोला ( दै.पंढरी नगरी न्यूज) दि. २१/०३/२०२६ रोजी रात्री ११/०० वा. चे सुमारास सांगोला येथील पंढरपुर ब्रीजच्या पुढे थोड्या अंतरावर एका काळ्या रंगाची विना नंबरची थार गाडीतील अनोळखी इसमानी फिर्यादी दिलीप भागोजी पाटील वय ५८ वर्षे व्यवसाय गाडीचे स्पेअर पार्टचे दुकान रा. भोगम कॉलनी मौजे चिंचवड ता. करवीर जि. कोल्हापुर यांचे गाडीला कट का मारला म्हणुन गाडी आडवी लावुन थांबवुन त्यातील चार अनोळखी इसमांनी फिर्यादीला दमदाटी व शिवीगाळ करुन फिर्यादीच्या डिकीतील दोन कपड्याच्या बॅगा त्यामधील एका बॅगेमध्ये ठेवलेले २ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम असलेली बग व चालकाचे दोन मोबाईल फोन व फिर्यादीच्या पत्नीवे ओरिजनल आधारकार्ड, पॅनकार्ड, चार वेगवेगळ्या बँकांचे ए.टी.एम. कार्ड असे जबरदस्तीने चोरुन नेले आहेत. वगैरे मजकुर तक्रार दिल्याने सांगोला पोलीस ठाणे गु.र.नं. २५६/२०२६ बी.एन.एस. ३०९ (४), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक विनोंद घुगे सांगोला पोलीस ठाणे यांनी सांगोला पोलीस ठाणे गु.र.नं. २५६/२०२६ बी.एन.एस. ३०९ (४), ३(५) या गुन्ह्याच्या अनुशंगाने तपासकामी सांगोला पोलीस ठाणेकडील वेगवेगळी शोध पथके तयार करुन रवाना करण्यात आलेली होती. सदर पथकाने गोपनीय माहितीच्या व तांत्रिक पुराव्याच्या आधारे अज्ञात आरोपीतांची गोपनीय माहिती काढली असता, सदर गुन्ह्यात वापरलेली विना नंबरची थार गाडी हि कोल्हापुर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली, त्यावेळी सांगोला पोलीस ठाणेकडील पथकाने कोल्हापुर येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने सदर थार गाडीचा मालक गौशपाक उर्फ मुन्ना, अब्दुलरजाक जमादार रा. कोरोची कोल्हापुर यास गाडीसह ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यावेळी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता सदर गुन्ह्यातील फिर्यादीचा ड्रायव्हर २) रामचंद्र बापू सांळुखे वय ४५ वर्षे, रा. गणेशनगर मांगले ता. बत्तीस शिराळा जि. सांगली, सध्या रा. वळीवडे ता. करवीर जि. कोल्हापूर हा मुख्य आरोपी असल्याचे समजले. व त्याचे सोबत ३) संदिप बाबासो मेडगुळे वय ३६ वर्षे रा. शिवाजीनगर कोरोची ता. हातकणंगले जि. कोल्हापूर ४) महेश मारूती कांबळे वय ३८ वर्षे रा. उचगाव ता. करवीर जि. कोल्हापूर ५) शिवाजी माळी कोल्हापुर यांनी मिळून सदरचा गुन्हा केल्याची माहिती दिल्याने पोलीस पथकाने सदर गुन्ह्यातील आरोपी नामे थार गाडीचा मालक १) गौशपाक उर्फ मुन्ना, अब्दुलरजाक जमादार रा. कोरडी कोल्हापुर, २) फिर्यादीचा ड्रायव्हर २) रामचंद्र बापू सांळुखे वय ४५ वर्षे, रा. गणेशनगर मांगले ता. बत्तीस शिराळा जि. सांगली, सध्या रा. वळीवडे ता. करवीर जि. कोल्हापूर ३)) संदिप बाबासो मेडगुळे वय ३६ वर्षे रा. शिवाजीनगर कोरोची ता. हातकणंगले जि, कोल्हापूर ४) महेश मारूती कांबळे वय ३८ वर्षे रा. उचगाव ता. करवीर जि. कोल्हापूर यांना ताब्यात घेवून कसून चौकशी केली असता वरील सर्व लोकांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करुन आज दिनांक २६/०३/२०२६ रोजी मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो, कोर्ट सांगोला यांचे न्यायालयात हजर केले होते. सदर वेळी मा. हु।। न्यायालयाने सदर आरोपीतांना दिनांक ३०/०३/२०२६ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे. तसेच सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोउपनि सागर पाटील हे करीत आहे.
सदरची कामगिरी अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक, सोलापुर ग्रामीण, प्रितम यावलकर अपर पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण, डॉ. बसवराज शिवपुजे उपविभागीय पोलीस अधिकारी , मंगळवेढा, यांचे मार्गदर्शनाखालील पोलीस निरीक्षक विनोंद घुगे सांगोला पोलीस ठाणे यांचे आदेशान्वंये पोउपनि चंद्रकांत पुजारी, पोउपनि सागर पाटील, पोहेकों मच्छिद्र राजगे, पोहेकॉ दत्ता वजाळे, पोहेकॉ अस्लम काझी, पोकों लक्ष्मण वाघमोडे, पोकों अमर पाटील तसेच सायबर पोलीस ठाणेचे पोकों राहुल सोनकर यांनी सदरची कारवाई केली आहे.