शेती अवजारे खरेदीसाठी ३६ लाख ५१ हजार रुपये मंजूरजिल्हा परिषद सेस फंड : २८१ शेतकऱ्यांना लाभ - गट विकास अधिकारी प्रशांत काळे यांची माहिती
-----------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज) राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबवत आहे. शेतकऱ्यांना शेतीमधून चांगले उत्पादन मिळाले व शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावे हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो. जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत सेस फंडातून राबविण्यात येणाऱ्या योजनांतून पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी विविध शेती अवजारे खरेदीसाठी ३६ लाख ५१ हजार ७५० रुपये इतका निधी मंजूर झाला असल्याची माहिती गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून तालुक्याती२८१ शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर शेती अवजारे खरेदीसाठी लाभ मिळाला असून, पहिल्याटप्प्यात १७ लाख २१ हजार रुपये इतके अनुदान लाभार्थींच्या खात्यावर जमा करण्यात आलेआहेत. आहे. तर दुसऱ्या टप्प्याची कार्यवाही सुरू असून, तात्काळ संबंधित शेतकरी लाभार्थींनालाभ देण्यात येणार आहे. अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांपर्यंत या योजनांचा लाभ पोहोचवणेहे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे गटविकास अधिकारी श्री. काळे यांनी सांगितले.
पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी थ्रीफिस्टन, बॅटरीपंप, रोटावेटर, पल्टी नांगर, पेरणी यंत्र, पाणबुडी, डिझेल इंजिन, कडबाकुट्टी, ताडपत्री,स्लरी फिल्टर आदि साहित्याची मागणी केली होती. शेती उपयोगी अवजारांची आवश्यकता असलेल्याशेतकऱ्यांनी ७/१२ उतारा, ८ अ, आधारकार्ड, बँक पासबुकचे झेरॉक्स यासह अर्ज करावेत. पाणबुडी,कडबाकुट्टी या अवजारांची मागणी असल्यास वरील कागदपत्रांबरोबर लाईट बिल तसेच कडबा कुट्टीसाठी जनावरे असल्याबाबतचा दाखला जोडण्यात यावा. रोटावेटर, पेरणी यंत्र, पल्टी नांगरचीमागणी केल्यास याच अर्जाबरोबर ट्रॅक्टरचे आर.सी.बुकची झेरॉक्स जोडण्यात यावे. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही काळे यांनी केलेआहे.