सांगोला तालुक्यात शे.का.प .ला जबर हादरा.. पंढरपूर - भाळवणी गटातील जुन्या शे.का प. कार्यकर्त्यांचा दिपक साळुंखे- पाटील गटात असंख्य कार्यकर्त्यांचा प्रवेश दीपक साळुंखे - पाटील यांना भाळवणी गटातून मोठे मताधिक्य मिळणार

सांगोला तालुक्यात शे.का.प .ला जबर हादरा..  पंढरपूर - भाळवणी गटातील जुन्या शे.का प. कार्यकर्त्यांचा दिपक साळुंखे- पाटील  गटात असंख्य कार्यकर्त्यांचा  प्रवेश  दीपक साळुंखे - पाटील यांना भाळवणी गटातून मोठे मताधिक्य मिळणार

------------------------------------------------------------------------------------

सांगोला( दै.पंढरी नगरी न्यूज) विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसे सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाला दररोज एकापाठोपाठ एक हादरे बसू लागले आहेत. शेकाप पक्षातील मनमानी कारभाराला कंटाळून सांगोला विधानसभा मतदारसंघातील भाळवणी जिल्हा परिषद गटातील शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपक साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे दीपक साळुंखे पाटील यांचा भाळवणी गटात मोठा राजकीय दबदबा निर्माण झाला आहे .प्रवेश केलेल्या सर्व तरुणांनी भाळवणी जिल्हा परिषद गटातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार दिपक साळुंखे पाटील यांना विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. 

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना शेकाप पक्षातील मनमानी कारभाराला कंटाळून तसेच सध्याचे शेकापचे नेतृत्व विश्वासात घेत नसल्याने सांगोला विधानसभा मतदारसंघातील भाळवणी गटातील शेकापच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षाला अखेरचा सलाम करीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे. शेकडो कार्यकर्त्यांनी शेकापची साथ सोडत दिपक साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. या घडामोडींमुळे ऐन निवडणुकीत शेकापला जबर धक्का बसला आहे.

यावेळी दीपक साळुंखे पाटील गटात प्रवेश करणारे कार्यकर्ते खालील प्रमाणे -

रोहित भोसले, निखिल भोसले, प्रतीक चव्हाण, आकाश लांडगे, आकाश सावंत, विक्रम साठे, अमित भोसले, मोनू गायकवाड, धीरज गायकवाड, राजदीप गायकवाड, सुरज गायकवाड, सुमित गायकवाड, अनिल गायकवाड, मिलिंद कांबळे, विजय लोखंडे, अजय लोखंडे, सचिन गायकवाड, बबलू गायकवाड, संजय लोंढे, ज्ञानेश्वर लोखंडे, अमर सातपुते, गणेश कांबळे, सिद्धार्थ गायकवाड, निखिल भोसले, अशोक चव्हाण, लखन सावंत, विनायक सावंत, बबलू सावंत, सचिन सावंत, प्रफुल्ल गायकवाड, अविनाश गायकवाड, अविनाश कुचेकर, प्रवीण कुचेकर, संग्राम पवार, समर्थ पाले, किरण लोखंडे, सागर लिंगे, धुळा गायकवाड, बंडू शिंदे, आनंद चव्हाण, समाधान साठे, संदीप पवार, समाधान गायकवाड, बबन (दादा) शिंदे, राहुल गायकवाड, समीर काझी, दादा गायकवाड, मिलिंद गायकवाड, आकाश कुंभार, माऊली लांडगे, सागर तारळकर, इसुफ तांबोळी, संदीप पवार, शंकर पवार, गौरव पवार, सुभाष गायकवाड, अजित गायकवाड, श्रीमंत साठे या शेकापच्या भाळवणी गटातील कार्यकर्त्यांनी पक्षाला अखेरचा लाल सलाम करीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून मशाल हाती घेतली आहे.

यावेळी शिवसेनेचे युवा नेते यशराजे साळुंखे पाटील यांनी उपस्थित सर्व तरुणांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात स्वागत केले आणि आगामी काळात ज्या अपेक्षेने आपण दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला आहे त्या विश्वासाला अजिबात तडा जाणार नाही असा विश्वास व्यक्त केला. युवानेते आकाश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रवेश पार पडले. यावेळी गिरीश पाटील सर, सोमनाथराव गोरे, विठ्ठलकाका बेहरे, अमरदादा लोखंडे आदीसह मान्यवर उपस्थित होते. शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार करीत शिवसेनेची मशाल हाती घेतली .