मारापुर ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम, एक तास गावच्या स्वच्छतेसाठी गावातील युवकांचा निर्णय
---------------------------------------------------------------------------------
मारापुर ( दै.पंढरी नगरी न्यूज) ; मारापुर ग्रामपंचायत चे सरपंच विनायक यादव यांच्या एक तास गावासाठी या संकल्पनेतून गावातील युवकांना एकत्र करून प्रत्येक रविवारी आठ ते नऊ या वेळेमध्ये गावातील स्वच्छता करायची. याची सुरुवात गेल्या आठवड्यामध्ये सुरू केली. गावातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी स्वच्छतेचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचा गाव व पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे. याचे नियोजन डेप्युटी सरपंच अशोक आसबे ,युवा नेते राजकुमार यादव, तुकाराम यादव आनंदा पाटील , युवा नेते बालाजी यादव, डॉ .सत्यवान यादव, यांच्यावर सोपवले असून या अभिनव स्वच्छता उपक्रमाला गावातील सर्व नागरिकांनी स्वयं स्फूर्तीने सहभागी होऊन मदत करावी असे आवाहन ग्रामपंचायतीचे सरपंच विनायक यादव, उपसरपंच, सदस्य यांनी केले आहे.
गावाचा विकास करत असताना स्वच्छता पाणी व रस्ते या तिन्हीची सांगड घालून गावगाडा पुढे न्यावा यासाठी यापुढील काळामध्ये ग्रामपंचायत म्हणून काम करावयाचे आहे.
- विनायक यादव (सरपंच,मारापुर)