मारापूरचे नूतन सरपंच विनायक यादव यांचा देगाव ग्रामस्थांच्या वतीने सन्मान..

मारापूरचे नूतन सरपंच विनायक यादव यांचा देगाव ग्रामस्थांच्या वतीने सन्मान..

------------------------------------------------------------------------------------
जिल्हा परिषद निवडणुक लढण्यासाठी नूतन सरपंच विनायक यादवांची तयारी सुरू                                                                    ------------------------------------------------------------------------------------

मंगळवेढा (दै.पंढरी नगरी न्यूज ) : मारापूर ग्रामपंचायतीचे नूतन सरपंच विनायक यादव यांचा देगाव (ढेकळेवाडी )ग्रामस्थांच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला. नुकत्याच झालेल्या मारापुर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये युवा उद्योजक विनायक यादव यांनी जोरदार मुसंडी मारत युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करण्यात यश मिळवले. त्यामुळे निकालानंतर आजपर्यंत त्यांच्या लोकप्रियतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटातील प्रत्येक नागरिकाला असेचा किरण दिसून लागला आहे. गेल्या अनेक वर्षापासून विकासापासून वंचित राहिलेल्या भागात आता त्यांच्या रूपाने एक तेजस्वी पर्व सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे कारण त्यांचे जागोजागी होणारे स्वागत व सत्कार समारंभात त्याचा प्रत्यय दिसून येतो.
             
मारापुर ग्रामपंचायत मधील सत्ता परिवर्तनानंतर लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांचा ढेकळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सभापती व नूतन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर हे होते. यावेळी बोलताना श्री. यादव म्हणाले की मारापुर बरोबर इतरही गावांचा विकास विद्यमान आमदार समाधान दादा आवताडे यांच्या माध्यमातून करू व सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यायचा प्रयत्न करू.
                
सदर कार्यक्रमासाठी पाणी संघर्ष समितीचे नेते बापूसाहेब मेटकरी, धनाचे गडदे व त्याचबरोबर गणपत ढेकळे, बिरुदेव ढेकळे व इतर ढेकळेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.