४ वर्षानंतरही शरद पवारांनी अपेक्षाला ,ओळखलं

४  वर्षानंतरही शरद पवारांनी अपेक्षाला ,ओळखलं

---------------------------------------------------------------------------------

केडगाव(,दै.पंढरी नगरी न्यूज) : जि. पुणे - आपले कौशल्य सिद्ध करत नोकरीसाठी जपानमध्ये जाऊन एकटी राहत असलेली बोरीपार्धीची ( ता.दौंड ) लेक अपेक्षा ताडगे हीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कौतुक केले आहे.मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते अनिल ताडगे यांची ही मुलगी. अपेक्षा ही संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनाला जपानहून पुण्यात आली होती. संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनाची संकल्पना असलेली 'अहद ऑस्ट्रेलिया ते तहद कॅनडा'बाबतची अपेक्षाची क्लिप सोशल मीडियावरून मागील आठवड्यात फिरत होती. पवार यांनी ही क्लिप पाहिली होती. त्यामुळे त्यांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्याकडे तीच्याबाबत चौकशी केली. अधिवेशनाला ती आली असल्याचे समजताच पवार यांनी तिला पालकांसह व्यासपीठावर बोलावून बसण्यास जागा दिली. पवार यांनी अपेक्षा हीची आस्थेवाईकपणे चौकशी केली. नोकरीनिमित्त जपानमध्ये एकटी राहण्याचे धाडस पाहून पवार यांनी समाधान व्यक्त केले.

पवार यांच्या इच्छेनुसार संयोजकांनी तीला आपले मनोगत व्यक्त करण्यास सांगितले. अचानक झालेल्या या उदघोषणेमुळे अपेक्षा सुरवातीला गडबडून गेली. हे सर्व तिच्यासाठी अनपेक्षित होते.

*अधिवेशनात आरक्षणाच्या मागे लागू नका, आरक्षण कधी मिळेल, कसं मिळेल हे कोणाला सांगता येत नाही त्यापेक्षा नोकरी, उद्योग, व्यवसायासाठी देशात आणि देशाच्या बाहेर अनेक संधी आहेत. त्या युवकांनी आजमावल्या पाहिजेत असा सूर या अधिवेशनात होता. हाच धागा पकडत शरद पवार यांनी अपेक्षा हीचे कौतुक केले. अपेक्षा ही चार वर्षांपूर्वी जपानमध्ये नोकरीनिमित्त गेली आहे. ती संगणक अभियंता असून ती सध्या वेब डेव्हलपर म्हणून काम करत आहे. जपान मध्ये जाण्यापूर्वी संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्या मध्यस्थीने अपेक्षा हीने पवार यांचे आशीर्वाद घेतले होते. तोही प्रसंग पवार यांना काल आठवला. अपेक्षा'पुर्ती झाली - पालक*

अनिल ताडगे म्हणाले, 'मुली शिकल्या पाहिजेत त्यांनी नोकरी, व्यवसायात पुढे आले पाहीजे. याबरोबरच महिलांना राजकीय आरक्षणामध्ये ५० टक्के वाटा मिळाला पाहिजे या सुधारणावादी विचारांचा पवारसाहेब यांनी नेहमीच पाठपुरावा करत निर्णय घेतले आहे. मुलीचे कौतुक होताना पाहून आनंद वाटला. आमची 'अपेक्षा' पुर्ण झाली'.

अपेक्षा ताडगे म्हणाली, 'अधिवेशनातील प्रसंग माझ्यासाठी अविस्मरणीय आणि अनपेक्षित होता. कुटुंबातील सदस्यासारखी त्यांनी माझी विचारपूस केली. शुभेच्छा दिल्या. आरक्षणाबाबत संदिग्धता आहे त्यामुळे मुलामुलींनी आपल्या क्षमता विस्तारीत करून नव्या वाटा शोधल्या पाहिजेत. जगात खूप मोठ्या संधी आहेत.'