रावगांव येथे स्व .विठ्ठलराव गोवेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर संपन्न...

रावगांव येथे स्व .विठ्ठलराव गोवेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर  संपन्न...

---------------------------------------------------------------------------------

करमाळा (पंढरी नगरी न्यूज ) करमाळा तालुक्यातील रावगांव येथे स्व.विठ्ठलराव चंद्रभान गोयेकर यांच्या 11व्या पुण्यतिथीनिमित्त स्व. विठ्ठलराव चंद्रभान गोयकर सोशल फाउंडेशन व पुणे येथील अंधजन मंडळाचे एच .व्ही. देसाई नेत्र तपासणी केंद्र कर्जत व करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

यामध्ये मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मा वाटप, मोफत आरोग्य तपासणी, मोफत औषधे वाटप करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगर वस्ती येथील शाळेत फाउंडेशनच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले त्यानंतर गायनाचार्य ह. भ. प .माऊली महाराज मस्के श्रीगोंदा यांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते तद्नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिरात एकूण 186 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला  36 रूग्णांना मोतीबिंदू शस्ञक्रियेसाठी पुढे पाठवण्यात आले, आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वर्गीय विठ्ठलराव चंद्रभान गोयकर सोशल फाउंडेशन च्या वतीने गेली अकरा वर्ष विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून यापुढेही गावाला केंद्रबिंदू मानून स्व. विठ्ठलराव चंद्रमान गोयेकर सोशल फाउंडेशन च्या वतीने गावात सामाजिक उपक्रम राबविले जातील असे फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील गोयेकर यांनी सांगितले.