आमदार समाधान आवताडे यांनी मारापूर पाणी पुरवठा जलजीवन योजनेला १ कोटी १४ लाखाचा निधी

आमदार समाधान आवताडे यांनी मारापूर पाणी पुरवठा जलजीवन योजनेला १ कोटी १४ लाखाचा निधी

------------------------------------------------------------------------------------
    
मंगळवेढा( पंढरी नगरी न्यूज ) मारापुर ता.मंगळवेढा येथील जनजीवन योजनेअंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठासाठी एक कोटी 34 लाख रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली असून लवकरच कामाला सुरुवात होईल अशी माहिती लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांनी दिली.
        
या मिशनने 'गाव/वस्तीपासून घरांपर्यंत' पाणीपुरवठ्यावर लक्ष केंद्रित केले आहे आणि प्रत्येक  कुटुंबाला नळाने पाणी पुरवठ्याची तरतूद केली आहे जेणेकरून प्रत्येक कुटुंबाला नियमित आणि दीर्घकालीन आधारावर पुरेशा प्रमाणात आणि विहित दर्जाचे पिण्याचे पाणी मिळेल.
       
सदर पाणी प्रश्न पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे विद्यमान आमदार समाधान दादा आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली व लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांच्या अथक प्रयत्नामुळे मार्गी लागल्यामुळे पाण्यासाठीची पायपीट आता बंद होणार आहे.
         
सदर पाणीपुरवठा योजनेसाठी निधी मंजूर केल्याबद्दल मारापूरचे सरपंच विनायक यादव,उपसरपंच अशोक आसबे,सोसायटीचे चेअरमन राजकुमार यादव,बाळासाहेब यादव,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भगवान आसबे,सर्व ग्रामपंचायत सदस्य,सोसायटीचे सदस्य व मारापूर ग्रामस्थांनी आमदारांचे आभार मानले.