मारापूरचे सरपंच विनायक यादव यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर, सामाजिक व उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावरून दखल

मारापूरचे  सरपंच विनायक यादव यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर,  सामाजिक व उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावरून दखल

---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( पंढरी नगरी न्यूज ) महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष तथा ग्रामपंचायत मारापूर या स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकनियुक्त सरपंच विनायक माधवराव यादव यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच सेवा या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मारापूर माजी सरपंच माधवराव यादव यांच्या मार्गदर्शनाखाली व पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली पुरस्कारमूर्ती यादव यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक समाजकारण व राजकारण सेवाभावी क्षेत्रामध्ये अखंडपणे कार्य करून आपल्या नेतृत्वाची वेळोवेळी चुणूक दाखवून दिली आहे.

गाव खेड्यातील सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत व पायाभूत प्रगतीसाठी व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंच विनायक यादव यांनी भरीव निधी खेचून आणत गावचा कायापालट होण्यासाठी अनमोल योगदान दिले आहे. गाव पातळीवर रस्ते, वीज, पाणी, शिक्षण व आरोग्य या सुविधांच्या माध्यमातून त्यांनी जनतेला विकासाची नवी पहाट दाखवून दिली आहे. त्यांच्या कार्याची ही कौतुकास्पद कामगिरी बघून महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाने काही महिन्यांपूर्वीच त्यांना मंगळवेढा तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे.

आमदार समाधान आवताडे यांच्या सखोल नेतृत्वाखाली राजकीय व सामाजिक कार्यक्षेत्रात कार्य करत असताना जनतेला केंद्रस्थानी ठेवून प्रामाणिकपणे सेवा केल्याचे अतिशय मोठे फळ या पुरस्काराच्या रूपाने मला प्राप्त झाल्याची भावना सरपंच विनायक यादव यांनी व्यक्त केली आहे. या पुरस्कारामुळे येणाऱ्या काळामध्ये जनतेची सेवा करण्यासाठी जबाबदारी आणखी वाढली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

त्यांच्या या यशप्राप्तीबद्दल श्री संत दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे, पुणे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, आवताडे शुगर अँड डिस्टिलरीचे चेअरमन संजय आवताडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप खांडेकर, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, भाजपा विधानसभा अध्यक्ष राजेंद्र सुरवसे, आवताडे शुगर मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके, जिल्हा लेबर फेडरेशन नूतन संचालक शाम पवार, मारापूरचे उपसरपंच अशोक आसबे, तंटामुक्ती अध्यक्ष भगवान आसबे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, सुदर्शन यादव, अशोक यादव, डॉ सत्यवान यादव, अभिमान जानकर व तालुक्यातील विविध गावांचे आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, संचालक तसेच इतर नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्य वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.