बार्शीचे कॉलेज ऑफ एज्युकेशन - एक अभिनव शिक्षक प्रशिक्षण संशोधन केंद्र , २० जून वर्धापन दिनविशेष निमित्त आठवण

बार्शीचे कॉलेज ऑफ एज्युकेशन - एक अभिनव शिक्षक प्रशिक्षण संशोधन केंद्र ,  २० जून वर्धापन दिनविशेष निमित्त आठवण

------------------------------------------------------------------------------------

बार्शी (दै.पंढरी नगरी न्यूज ) छत्रपती श्री शिवाजी महाराज व कर्मवीर डॉ.निवृत्ती गोविंदराव तथा मामासाहेब जगदाळे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. श्री क्षेत्र बार्शी हे श्री भगवंत व कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या कार्यसिद्धीने अलौकिक आहे.महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेले कर्मवीर डॉ .मामासाहेब जगदाळे यांचे कार्य अद्वितीय आहे.शेतकरी कुटुंबातील मुला- मुलींच्या शिक्षणासाठी मामासाहेबांनी आपले जीवन समर्पित केले. सोलापूर व धाराशिव यासारख्या ग्रामीण भागातील शेतकरी व गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी मामासाहेबांनी शैक्षणिक संस्था स्थापन केल्या.शिक्षण हेच मानवी जीवनात क्रांती घडवून आणते यावर मामांचा प्रचंड विश्वास होता. ग्रामीण भागातील शैक्षणिक व सामाजिक जडणघडणीत मामाच्या शिक्षण व आरोग्य संकुलाचे योगदान उल्लेखनीय आहे.कर्मवीर मामांनी स्वतःचा संसार सोडून दिला. आणि शिक्षण प्रसाराचे प्रसाराचे सामाजिक कार्य सुरू केले.सन १९३४ मध्ये एका विद्यार्थ्यास घेऊन गरीब विद्यार्थ्यांसाठी मामानी बार्शी येथे श्री शिवाजी शिवाजी मराठा बोर्डिंग ची स्थापना केली.यातूनच मामांनी बार्शी येथे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना सन १९४७ मध्ये केली .आज या कर्मवीर शैक्षणिक संकुलात विविध अभ्यासक्रम चालवले जातात. तसेच ग्रामीण भागातील गरीब व गरजू रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधांचे जगदाळे मामा हॉस्पिटल सेवा उपलब्ध करून देत आहे.

आपल्या शैक्षणिक संस्थेतून समाजाला प्रेरक व उत्कृष्ट शिक्षक निर्माण करण्याच्या पवित्र व उदात्त हेतूने कर्मवीरांनी २० जून १९६६ रोजी बार्शी येथे कॉलेज ऑफ एज्युकेशन ची स्थापना केली. उत्कृष्ट ज्ञान व कौशल्यांच्या जोरावर शिक्षक समाजाची प्रगती करू शकतो यावर मामांचा विश्वास होता.या महाविद्यालयाची गुणवत्ता, विस्तार व प्रगती लक्षात घेता,मामांचे स्वप्न साकार झाल्याचे दिसून येते.आज 20 जून या दिवशी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो.

        आज या महाविद्यालयात बी.एड., बी.पी.एड.,एम.एड., एम. पी.एड.,पीएच.डी., एम.ए. शिक्षणशास्त्र डी.एस.एम. आदी विविध प्रकारचे अभ्यासक्रम चालवले जातात. भौतिक व मानवी सुविधांनी महाविद्यालय संपन्न आहे.भव्य क्रीडांगण, समृद्धग्रंथालय,प्रयोगशाळा,जिम,जिमखाना, जलतरण तलाव,क्रीडा संकुल, वस्तीग्रह, आदी सुविधा उपलब्ध आहेत. विद्यार्थी, शिक्षक ,कर्मचारी व पालक यांच्या नाविन्यपूर्ण योगदानाच्या जोरावरच महाविद्यालयाने यशस्वी सुवर्ण भरारी घेतली आहे. शैक्षणिक व प्रशासकीय मूल्यांकन यामध्येही महाविद्यालयाने यशस्वी सुवर्ण भरारी घेतली. महाविद्यालयात विद्यापीठ संशोधन केंद्र आहे . नॅक पुनर मूल्यांकनात "अ"श्रेणी प्राप्त केलीआहे. शैक्षणिक व प्रशासकीय मूल्यांकन यामध्ये महाविद्याने "अ" श्रेणी प्राप्त केली आहे.महाविद्यालयात विद्यापीठ ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदा, सेमिनार यांचे आयोजन केले जाते. तज्ञ प्राध्यापक व क्रीडा मार्गदर्शक यांच्या योगदानातूनच विद्यार्थी यश संपादन करत आहेत.प्रशिक्षणार्थी केंद्री विकास प्रणाली हा महाविद्यालयाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. वर्तमान समाजातील गरजा व अपेक्षा पूर्ण करण्यास सक्षम असा विद्यार्थी घडविण्याचा महाविद्यालयाचा निरंतर प्रयत्न राहिला आहे.सेवा पूर्व प्रशिक्षण याचबरोबर जीवनशैली,सॉफ्टस्किल, मूल्ये, समुपदेशन,संभाषण आदी घटकाबाबत देखील प्रशिक्षणार्थींना सक्षम करण्यासाठी महाविद्यालय प्रामाणिक प्रयत्न करत आहे. शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षण शास्त्र अशा दोन्ही अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण येणारे हे एकमेव महाविद्यालय आहे.प्रशिक्षण कालावधीनंतर रोजगार व सेवा संधी उपलब्धता याबाबत प्रशिक्षणार्थींना सविस्तर माहिती दिली जाते. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी महाविद्यालयाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.याचा आम्हास सार्थ अभिमान आहे. 

         बार्शीचे कॉलेज ऑफ एज्युकेशन हे एक शैक्षणिक प्रयोगशाळा म्हणून लोकप्रिय आहे.महाविद्यालयात शैक्षणिक व सामाजिक गरजेनुसार उपक्रम व कार्यक्रम राबवले जातात.राष्ट्रीय सेवा योजना माध्यमातून समाज उपयोगी उपक्रम व शिबिर आयोजित केले जाते.कर्मवीर जलतरण तलाव,क्रीडा संकुल, प्रयोगशाळा व इतर सोयी सुविधा द्वारे सामाजिक योगदान यावर महाविद्यालयाचा भर राहिला आहे. सेवापूर्व तंत्रस्नेही शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयात दिले जाते.उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षक निर्माण केले जात आहेत.यातूनच प्रशिक्षणार्थी मध्ये स्वयंरोजगार क्षमता विकसित केली जाते.

         उद्याचा काळ बदलांचा व आव्हानांचा आहे महाविद्यालय देखील बदल स्वीकारण्यास व वर्तमान कार्यात सुधारणा करण्यास सक्षम आहे.ज्ञान, तंत्रज्ञान,कौशल्य,मूल्ये, क्षमता विकासाच्या बाबत महाविद्यालय नेहमीच प्रयत्नशील आहे. बदलत्या काळानुसार आव्हानांना सकारात्मकतेने सामोरे जाण्यास महाविद्यालय देखील सक्षम आहे. 

            कोविड 19 मुळे संपूर्ण जग विविध आव्हानांना सामोरे गेले होते.जीवन प्रणाली ढासळली होती. शिक्षण क्षेत्रही याला अपवाद नव्हते.याच पार्श्वभूमीवर प्राचार्य डॉ.एस.एस. गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन अध्ययन,अध्यापन, मूल्यमापन,संशोधन,प्रशिक्षण आदीबाबत सकारात्मक विचार जोपासून कार्यप्रणाली राबवली. याचे विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, पालक यांनी मोठ्या प्रमाणात स्वागत केले. 

           महाविद्यालयाच्या समृद्ध विकासात आमची संस्था नेहमीच सक्रिय राहिली आहे.संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी .वाय.यादव, उपाध्यक्ष श्री नंदकुमार जगदाळे, जनरल सेक्रेटरी प्रकाश पाटील, सहसचिव श्री अरुण देबडवार, खजिनदार श्री जयकुमार शितोळे, संस्थेचे कार्यकारणी सदस्य, विश्वस्त,सदस्य ,हितचिंतक यांचे मार्गदर्शन व सहकार्य यामुळेच महाविद्यालय आज विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करत आहे. २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून डॉ. एस.एस.गोरे हे महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून सक्षम कार्य करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाने शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. विद्यापीठाच्या विविध अधिकार पदावर प्राचार्य डॉ.एस.एस.गोरे कार्यरत आहेत. त्यांच्या शैक्षणिक, प्रशासकीय ,संशोधन, सामाजिक कार्याची दखल घेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने प्राचार्य डॉ.एस.एस. गोरे यांना २०१९-२० मध्ये उत्कृष्ट प्राचार्य म्हणून गौरविण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष २०२३ मध्ये श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाने आदर्श शाखाप्रमुख म्हणून त्यांचा गौरव केला आहे.शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये महाविद्यालयाने नॅक बेंगलोर या संस्थेकडून 3.04 सीजीपीए गुण मिळवून "अ" श्रेणी प्राप्त करून महाविद्यालयाच्या गौरवशाली परंपरेत भर घातली आहे. याचा आम्हास मनस्वी रास्त अभिमान वाटतो. ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना उत्कृष्ट सेवा पूर्व शिक्षक प्रशिक्षण देण्यात बार्शीचे कॉलेज ऑफ एज्युकेशन एकमेवाद्वितीय ठरले आहे. भविष्यातील गरजा व अपेक्षा ओळखून परिणामकारक ध्येयधोरणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी येथील प्रत्येक मानवी घटक आपले योगदान देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. विधायक सामाजिक जडणघडणीत महाविद्यालय नेहमीच अग्रेसर राहिले आहे.कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या पवित्र व पुण्य पावन भूमीत सेवापूर्व शिक्षण ,प्रशिक्षण कार्य सकारात्मक व विधायक प्रयत्नांनी यशस्वी वाटचाल करीत आहे.महाविद्यालयाच्या वर्धापन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 

◼️ डॉ. सुग्रीव गोरे                                                     प्राचार्य,कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी,                             शैक्षणिक मूल्यमापन अभ्यास मंडळाचे सदस्य,                 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर.