बार्शी पंचक्रोशीत कर्मवीर ग्रंथालयाचे कार्यालयीन कामकाज कौतुकास्पद-- ह. भ. प .अँड धर्मकीर्ती तथा नितीन महाराज सावंत , कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयास सदिच्छा भेटी दरम्यान केले कौतुक
-----------------------------------------------------------------------------------
बार्शी( दै.पंढरी नगरी न्युज)संत साहित्याचे गाढे अभ्यासक ह.भ.प ॲड.धर्मकीर्ती तथा नितीन सावंत महाराज यांनी कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालय बार्शी येथे आज सदिच्छा भेट दिली.यावेळी ग्रंथालयातील विविध विषयांवरील ग्रंथसंपदा,इतर वाचन साहित्य व अन्य कामकाज पाहून समाधान व्यक्त केले.
तसेच समृद्ध संतसाहित्याचा व वाचन संस्कृतीचा अनेक वर्षांपासूनचा वारसा जतन करणेसाठी तसेच सर्वसामान्यांना हे साहित्य अगदी सुलभ उपलब्ध होणेसाठी सार्वजनिक वाचनालयांची गरज आहे,ते काम आपल्या कर्मवीर ग्रंथालयाच्या वतीने होत आहे याचे खरोखरचं कौतुक वाटते.या औचित्याने ह.भ.प.ॲड.धर्मकीर्ती महाराज यांचा ग्रंथपाल विनोद गायकवाड यांनी ग्रंथभेट व मोत्याची माळ प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.या प्रसंगी प्रदीप देवराम यांचेसह सभासद व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.