बार्शीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव निमित्त श्रमदान , पक्षांसाठी पाण्याची व्यवस्था करून यशोदा पार्क मधील बालगोपाळाची छत्रपती शिवरायांना मानवंदना

बार्शीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव निमित्त श्रमदान ,   पक्षांसाठी पाण्याची व्यवस्था करून यशोदा पार्क मधील बालगोपाळाची छत्रपती शिवरायांना मानवंदना

------------------------------------------------------------------------------------

बार्शी ( दै.पंढरी नगरी न्यूज ) : रयतेचे राजे, कुळवाडी भूषण तथा पर्यावरण प्रेमी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने यशोदा पार्क,बार्शी येथील बाल- गोपाळानी वृक्ष संवर्धन , स्वच्छता मोहीम राबवून तसेच पक्षांसाठी उन्हाळ्यात पाण्याची सोय करून शिवजयंती निमित्त विनम्र अभिवादन केले.

संपूर्ण देशभरात व बार्शी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सर्व मुलांनी एकत्र येऊन श्रमदान तसेच वृक्षांची देखभाल व पक्षांना पाण्याची व्यवस्था करून देण्याचे ठरवले.सकाळी सात वाजता सर्व मुले एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत कामाची सुरुवात केली आणि समूहाने अभिवादन केले.

यशोदा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद गायकवाड सर सचिव धनंजय काळे सर तसेच मार्गदर्शक शिक्षक गणेश वाघमारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हर्ष नलावडे,सुमित कदम,वेदांत पिंगळे,प्रतीक गायके,देव खर्डेकर युवराज शिंदे,आरुष तेवर,वरद चौरे, कृष्णा वाघमारे,ऋषी पवार, रुद्र पतंगे यांनी स्वच्छता व श्रमदानाच्या घेण्यात आपला सहभाग नोंदवला.