बार्शीच्या कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात कवी कुसुमाग्रज मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहाने साजरा...
------------------------------------------------------------------------------------
बार्शी (दै.पंढरी नगरी न्यूज) : येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा पद्मभूषण वि.वा.उर्फ तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्याने "मराठी राजभाषा गौरव दिन" म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रमुख मान्यवरांचे शुभहस्ते प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करुन पूजन करण्यात आले.यावेळी सेवानिवृत्त फूड निरीक्षक भागवत बोबडे , विजयसिंह देशमुख,बशीर पठाण आदी उपस्थित होते.मराठी राजभाषा गौरव दिनाच्या अनुषंगाने मराठी भाषेचे महत्व प्रमुख मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विषद केले.यावेळी अमित कदम,प्रेम अग्रवाल,प्रेम लोंढे यांचेसह वाचक व सभासद उपस्थित होते,कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रंथपाल विनोद गायकवाड यांनी केले.