तुळजापूर येथील नवोदय विद्यालयात गणित दिन साजरा..
------------------------------------------------------------------------------------
तुळजापूर (दै .पंढरी नगरी न्यूज) : जवाहर नवोदय विद्यालय थोर गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस डिसेंबर हा गणित दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम विद्यालयाचे प्राचार्य श्री गंगाराम सिंह , गणित अध्यापक प्रमोद खरबास ,वैभव कुलकर्णी, श्रीनिवास गजम यांच्याद्वारे श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. या गणित दिवसाच्या औचित्य साधून हर्षदा कुलकर्णी, गौरी स्वामी, स्नेहा कवडे यांनी गणित विषयावरती प्रश्नोत्तरी, सुविचार, भाषण यांचे सादरीकरण केले. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री गंगाराम सिंह यांनी जीवनातील गणिताचे महत्त्व स्पष्ट करताना शून्याचे महत्त्व सांगून विज्ञान व तंत्रज्ञान गणितावर कसे आधारित आहे यावर आपले विचार स्पष्ट केले. या कार्यक्रमाचे संचालन श्री एच जी. जाधव यांनी केले.