पंढरपूर शहरात मंगळसूत्र चोरीच्या प्रमाणात वाढ..

पंढरपूर शहरात मंगळसूत्र चोरीच्या प्रमाणात वाढ..

---------------------------------------------------------------------------------
महिलांमधून असुरक्षित विषयी भितीचे वातावरण ,निष्क्रिय पोलीस खात्याविषयी नाराजी
---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) : पंढरपूर शहरातील विविध भागांमध्ये महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीच्या प्रमाणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे यामुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून अशा प्रकारच्या चोरीमधिल सर्रास चोर हे महिला रस्त्यावरून चालत असताना पाठीमागून बिगर नंबर प्लेटच्या मोटरसायकल वरून तोंडाला रुमाल बांधून येत डोळ्याची पापणी लवते न लवते तोपर्यंत ते चालू गाडीवरूनच महिलांच्या गळ्यातील दागिन्यांवर झडप घालून वाऱ्यासारखे पसार होतात.

अशा घटनांमध्ये काही महिलांच्या गळ्याला मोठ्या प्रमाणात दुखापतीही झाल्या आहेत. तर पंढरपूर हे राज्याचे आराध्य दैवत असून या ठिकाणी दररोज हजारो भाविक भक्त विठ्ठल रुक्मिणी दर्शनाकरिता येत असतात यामध्ये महिलांचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर पायबंद घालणे गरजेचे असताना पंढरपूर शहरातील विविध भागांमध्ये अशा घटना माञ होतच असल्याचे दिसून येत असल्याने यामध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी लक्ष देऊन यातील गुन्हेगारांना पकडून या कठोर कारवाई कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. तर या अगोदर अशा घटनांमध्ये ज्या महिलांचे सोने चोरीस गेले आहे. त्यातील अनेक महिलांच्या सोने चोरीचा तपास लावल्यास पंढरपूर शहर पोलीस स्टेशन अपयशी ठरत असल्याचे दिसत असल्याची चर्चा नागरिकांमधून होतआहे.