विठ्ठल - रुक्मिणी मातेस विठ्ठल भक्तांकडून २ किलो १०८ ग्रॅम चांदीची घागर भेट
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (पंढरी नगरी न्युज ) आज दि. 11/12/2023 आजरोजी श्री चैतन्य विठ्ठल मंदिर तामिळनाडू येथील भाविकांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस 2 किलो 108 ग्रॅम वजनाची चांदीची घागर भेट दिली त्याची अंदाजित रक्कम रु 150000/- आहे.

त्यावेळी मंदिर समितीच्या कार्यालयात देणगीदार यांचा यथोचित सत्कार श्री ची प्रतिमा व उपरणे देऊन मंदिरे समितीचे सोने चांदी विभाग प्रमुख यांचे हस्ते करण्यात आला. त्यावेळी मंदिरे समितीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.