आमदार आवताडे बंधूंच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पंढरपुरात केले अभिवादन..
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( दै .पंढरी नगरी न्युज ) : आज दि.६ रोजी सकाळी पंढरपूर येथे बोधिसत्व, विश्वरत्न,भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, प्रज्ञासूर्य, परम पूज्य महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंढरपूर येथील स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पंढरपूर - मंगळवेढा मतदार संघाचे भाजपाचे आमदार समाधान आवताडे यांचे बंधू आवताडे शुगर अँड डिस्टिलरीज चे चेअरमन तथा नामवंत उद्योजक श्री.संजय आवताडे यांनी त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी बोलताना संजय अवताडे म्हणाले की, जगातील सर्वात मोठी भारतीय लोकशाही बाबासाहेबांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाच्या पायावर कणखरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मर्चंट बँकेचे चेअरमन नागेश भोसले, नगरसेवक डी.राज. सर्वगोड, आर.पी. आय.अध्यक्ष संतोष पवार, .नगरसेवक .सुनील सर्वगोड,.संतोष डोंगरे,तात्या जगताप,आदित्य फत्तेपूरकर, विनोद लटके,महेश चव्हाण, भैयासाहेब कळसे,शेखर बंटी भोसले, .राहुल गावडे,.पांडूरंग वाडेकर इ मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.