प्राचार्य शिवाजीराव बागल यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार प्रदान..
----------------------------------------------------------------------------------
पंढरपूर ( पंढरी नगरी न्यूज ) अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांचे ग्रामीण साहित्य घरोघरी पोहोचले आणि ज्यांच्या मराठी साहित्याचा लौकिक महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेर झाला, असे ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्राचार्य शिवाजीराव बागल यांच्या 'गाव खेड्यातील खेळ ‘ या बालकादंबरीला अखिल भारतीय शब्द मंथन समुहाचा डॅा.रविराज आसबे स्मृती राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. *वाळवे ( खुर्द ), तालुका कागल जि.कोल्हापुर येथे दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी *संपन्न झालेल्या कार्यक्रमामध्ये प्राचार्य शिवाजीराव बागल यांना सन्मानित करण्यात आले.
श्री.राजन मुठाने, संमेलन अध्यक्ष श्रीकांत पाटील सर ,स्वागत अध्यक्ष तानाजी आसबे , गटशिक्षण अधिकारी गणपत कळमकर, परशुराम आंबी, सौ.नसीम जमादार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.. प्राचार्य शिवाजीराव बागल यांच्या साहित्याला यापूर्वी विविध २७ राज्यस्तरीय पुरस्कार व सन्मान मिळालेले असून विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.