सिद्धेवाडी ग्रामस्थ व कृतज्ञता सन्मान सोहळा समितीच्या वतीने शेतकरी व कष्टकऱ्यांचा होणार सन्मान
--------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर प्रतिनिधी : पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी येथील आदर्श प्रगतशील शेतकरी व मोलमजुरी करणारे कष्टकरी यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती कृतज्ञता सन्मान सोहळा समितीच्या वतीने देण्यात आली. सिद्धेवाडी गावातील ज्यांनी आदर्श वाटावी अशी शेती कसून आपल्या कुटुंबाची प्रगती केली. अशा शेतकऱ्यांचा आणि काबाडकष्ट करून घर चालवलेल्या अशा कष्टकऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला असून शनिवार दिनांक २९ रोजी सायंकाळी ७:०० वाजता गावातील मारुतीच्या समोरील पटांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अआहे.
यावेळी निवड समितीच्या वतीने गोपीनाथ मच्छिंद्र जाधव .छगन जगन्नाथ जाधव. दिलीप विष्णू जाधव .आप्पा भगवान गोडसे. यांना प्रगतशील शेती पुरस्कार तर कंकूबाई रामचंद्र मोलाने .बाळासाहेब राघू फडतरे यांना आदर्श कृषी श्रमिक या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
कार्यक्रम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव डॉ.जे .जी .जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हा आदर्श पुरस्कार सन्मान सोहळा होणार असून यावेळी प्रगतशील शेतकरी व शासनाने राज्यस्तरीय डाळिंब रत्न पुरस्काराने देऊन सन्मानित करण्यात आलेले सरकोली चे दत्तात्रय साहेबराव भोसले व पंढरपूर तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे यांचे शेतकऱ्यांना शेती विषयावर अभ्यासपूर्व मार्गदर्शन होणार आहे.
या आदर्श शेतकरी व कृषी श्रमिक कृतज्ञता सन्मान सोहळ्यास विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक गोकुळ जाधव. वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी जाधव .पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नागनाथ शिंदे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक दशरथ जाधव .तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बजरंग जाधव. पोलीस पाटील दत्तात्रय जाधव .उपसरपंच लक्ष्मण गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
चालू वर्षापासून हा पुरस्कार सन्मान सोहळा सुरू होत असून यापुढेही प्रत्येक वर्षी चार शेतकरी व दोन कष्टकरी शेतमजूर यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे .तरी सिद्धेवाडी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ शेतकरी बांधव .तरुण वर्ग .विविध व्यवसायिक .शिक्षक बांधव व उद्योजक यांनी आपले कुटुंबीयांसोबत या सन्मान सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आदर्श शेतकरी व कृषी श्रमिक कृतज्ञता सन्मान सोहळा समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.