*शिरढोण येथे एकावर प्राण घातक हल्ला करून आरोपी फरार...*
------------------------------------------------------------------------------
आरोपीवर पोलिसात गुन्हा दाखल
------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (प्रतिनिधी) शिरढोण तालुका पंढरपूर येथील परमेश्वर भूसनर व पत्नी सुवर्ण परमेश्वर भूसनर हे दोघे गावठाण मधील घर स्वच्छ करण्यासाठी मोटरसायकल वरून गेले होते. तेथे गावातील सागर भीमराव शिंदे हा तिथे आला त्यांनी सुवर्णाचे पती परमेश्वर भूसनर यांना मोटरसायकल लावण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून तुला खलास करतो. असे म्हणत त्यांनी त्यांच्या घरात जाऊन घरातून लोखंडी तलवार आणून परमेश्वर भूसनर यांचे डोक्यात व उजव्या बाजूला हाताच्या बोटावर वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करून तो पसार झाला.
सदर घटनेबाबत फिर्यादी सुवर्ण परमेश्वर भूसनर यांनी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केल्याने भादवि कलम ३०७ ,५०४ ५०६,प्रमाणे आरोपी सागर भीमराव शिंदे रा. शिरढोण ता. पंढरपूर याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .सदर गुन्ह्यामधील आरोपी हा गुन्हा घडल्या पासून फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक नेमण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सांगितले. सदर आरोपीचा तपास पोलीस अधीक्षक सोलापूर तेजस्वीनी सातपुते .अप्पर पोलीस अधिकारी सोलापूर हिम्मत जाधव. पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम. व पंढरपूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप शिंदे तपास करीत आहे.*