देवडी येथील अक्षरसंस्कार गुरुकुल विद्यालयचे स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा...

देवडी येथील अक्षरसंस्कार गुरुकुल विद्यालयचे स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा...

------------------------------------------------------------------------------------

देवडी ( दै.पंढरी नगरी न्यू ) देवडी ता.मोहोळ येथील गुरुकुल पद्धती चा अवलंब करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीची हमी देणाऱ्या अक्षरसंस्कार गुरूकुल चे वार्षिक बक्षीस वितरण आणि स्नेह संमेलन अतिशय उत्साहाच्या वातावरणात पार पडले.

यावेळी अजित थोरबोले (उप जिल्हाधिकारी अहमद नगर) यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्यात आले. शिक्षणमहर्षी  दत्तात्रय कोंडलकर सर (शांतिनिकेतन गुरूकुल कोर्टी) , प्रा. प्रमोद आवताडे सर (श्रीकृष्ण उद्योग समूह कामती),  दिनकर दादा थोरात, (सोनाली एजन्सीज मोहोळ)  माननीय श्री सचिन जगताप (जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड पंढरपूर),  डॉक्टर निशांत शिंदे सर(CMO, नोबेल हार्ट केअर सेंटर सोलापूर ) माननीय श्री सुधाकर आदमीले (PSI सीआरपीएफ सोलापूर), डॉक्टर ज्ञानेश्वर नागरगोजे (समुदाय आरोग्य अधिकारी) माननीय  जमीर मोगल सर (संस्थापक बालविकास पूर्व प्राथमिक विद्यालय खर्डी) माननीय श्री विजयकुमार नागणे सर (संस्थापक विराज इंग्लिश मीडियम स्कूल नंदुर) माननीय श्री विठ्ठल भालेराव सर नॅशनल आर्चरी कोच यांच्या उपस्थितीत संमेलनाचा उद्घाटन सोहळा आणि बक्षीस वितरण समारंभ पार पडला.

आपली कला सादर करताना अक्षरसंस्कार गुरुकुलच्या बाल कलाकारांनी एकूण ३६ गाण्यांचा नृत्यविष्कार सादर केला. सर्वांचे पालकांनी आणि नागरिकांनी भरभरून कौतुक केले. तोफांच्या आवाजामध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आल. बक्षिसांचा वर्षाव करून नागरिकांनी व पालकांनी गुरुकुल ला प्रोत्साहन दिल. आपल्या मनोगतामधून डॉक्टर अजित थोरबोले सरांनी गुरुकुल चे सचिव नितीन डोंगरे सर आणि अध्यक्षा सई डोंगरे मॅडम यांच्या परिश्रमाचा आलेख मांडला त्याचबरोबर त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

प्राध्यापक प्रमोद अवताडे सर यांनी नितीन डोंगरे सर्व सई डोंगरे मॅडम यांचे कार्य ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा आदर्श समोर ठेवून सुरू आहे. असा निर्वाळा आपल्या मनोगतातून दिला व सर्वांना शुभेच्छा देऊन त्यांनी आपले मनोगत संपवले. गुरुकुल चे क्रीडा शिक्षक  शंकर जाधव सर,  मनीष सर ( धनुर्विद्या कोच) , स्वप्नाली वाखरकर,  प्रीती नाईकनवरे, सौ. नूतन थोरात, सौ. ऋतुजा सावंत, कु निर्मल परबत, कु. प्रगती गोफने या सर्वांनी सूत्र संचालन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. आबा वाखरकर, कृष्णा मुळे, मल्लिनाथ व्यवहारे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. या सर्वांचे अध्यक्षा  सई डोंगरे मॅडम आणि  नितीन डोंगरे सर यांनी मनःपूर्वक आभार मानले.