राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचा गाव प्लास्टिक मुक्त करण्याचा उपक्रम अतिशय स्तुत्य:- वसंतराव देशमुख सिद्धेवाडी येथे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर संपन्न..

राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचा गाव प्लास्टिक मुक्त करण्याचा उपक्रम अतिशय स्तुत्य:- वसंतराव देशमुख  सिद्धेवाडी येथे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर संपन्न..

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर -( पंढरी नगरी न्यूज )आजचा काळ बदलत चालला असून सर्व गोष्टी पैशात मोजले जातात. आई-वडिलांचे नाव करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आर्थिक संघर्षातून माणूस घडत असतो प्रतिकूल परिस्थितीमधून पुढे जाता येते असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिरामध्ये प्रमुख मार्गदर्शक तथा कासेगाव जिल्हा परिषदेचे सदस्य वसंतराव देशमुख यांनी व्यक्त केले. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालया व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन सिद्धेवाडी ता. पंढरपूर येथे करण्यात आले होते .

त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरपुर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत खिलारे होते, यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच रोहिणी जाधव ,वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी जाधव, सारंग जाधव, महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव गोडसे ,चिचुंबे येथील प्रतिष्ठित नागरिक आनंदराव क्षीरसागर, माजी सरपंच आनंदराव गोडसे ,बलभीम जाधव, इत्यादी प्रमुख उपस्थित होते.

त्यापुढे बोलताना जिल्हा परिषद सदस्य देशमुख म्हणाले की  म्हणाले की,  कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाला मोठा इतिहास आहे. राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्वच स्वयंसेवकांनी आपल्या गावाचे सर्वेक्षण करून त्याचा अभ्यास करायला पाहिजे. सिद्धेवाडी येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी प्लास्टिक मुक्ती करण्याचा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शहरातील जीवनापेक्षा ग्रामीण जीवन चांगले असल्याचे म्हटले. यामध्ये त्यांनी महात्मा गांधी यांच्या विचाराचा आठवण त्यांनी करून देताना ते म्हटले महात्मा गांधीजींनी खेड्याकडे चला असा संदेश दिला होता खेड्यामध्ये पण चांगले जीवन जगता येते आधुनिक पद्धतीने शेती केली तर पुढील काळ चांगला असेल असे त्यांनी सांगून पुढे म्हणाले की, बोलायला शिकले पाहिजे  विपणनाची कौशल्य आत्मसात केले पाहिजे शहरांना मर्यादा आहेत आपले गाव शहरासारखे केले तर आपणास मदत होते आपल्याच गावामध्ये रोजगार निर्मिती करावी राजकारणातही चांगल्या मुला - मुलींनी यावे आज महिला सरपंच देखील सक्षमपणे काम करताना दिसून येतात. 

यावेळी रयत शिक्षण संस्था सातारा माजी सचिव डॉ.प्राचार्य जे. जी जाधव( सर )आपल्या मनोगतामध्ये बोलताना म्हणाले की, काम करण्याची इच्छाशक्ती मनामध्ये असायला हवी. त्यासोबत आपल्या कामाबाबत आपण प्रामाणिक असायला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. जीवनात यशस्वी व्हायचा असेल तर श्रमाला पर्याय नाही. असे सांगून ते पुढे म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेतील सेवकांना या सात दिवसाच्या श्रमसंस्कार शिबिरातून नवीन अनुभव नवीन विचार आत्मसात करण्यास संधी मिळेल.

अध्यक्षपदावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे पुढे म्हणाले की, गावातून जाताना श्रमसंस्काराचे विचार घेऊन जावा. आधुनिक पद्धतीने शेती केल्यास भारतात आपण समृद्ध करू शकतो. गाव पातळीवर देखील काही प्रकल्प राबवली पाहिजे. प्रत्येकाने आई - वडिलांचे स्वप्न पूर्ण केले पाहिजे आपले आचरण चांगले पाहिजे आपण आपल्या विचाराची प्रगल्भता वाढवली पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या  स्वयंसेवकाचे भाग्य आहे की त्यांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागाची सेवा करण्याची संधी मिळते. सामाजिक जबाबदारीचे भान असणे आवश्यक आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचाराची आज गरज असल्याचे दिसून येते. सिद्धेवाडी ग्रामस्थांनी दिलेले सहकार्य कधी विसरता येणार नाही असे डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी मांडले.

सात दिवसाच्या श्रमसंस्कार शिबिराचे नियोजन महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेचे चेअरमन डॉ.दत्तात्रय चौधरी यांनी केले होते तर कार्यक्रमाधिकारी प्रा.सुमन केंद्रे, डॉ.बालाजी लोंढे यांनी दैनंदिन उपक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. राष्ट्रीय सेवा योजनेमधील सदस्य प्रा.सागर शिवशरण,प्रा.धनंजय कदम, डॉ. सचिन थिटे, डॉ संजय चव्हाण यांनी सहकार्य करून श्रमसंस्कार शिबिर यशस्वी पार पाडले. 

या निरोप समारंभासाठी महाविद्यालयातील विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा.आर.जे.कवडे, ग्रामसेवक शहाजी शेनवे, आरोग्य सेविका डॉ . सुरवसे मॅडम ,आरोग्य सेवक डॉ. मोरे ग्रामपंचायतचे सदस्य सुरेश गोडसे ,आप्पा जाधव, रमेश बनसोडे ,बालाजी जाधव, विजय जाधव ,सुनील जाधव ,भास्कर जाधव, धनाजी घुले ,दिलीप जाधव यांची इ. उपस्थित होते.  कार्यक्रमाचे आभार प्रा. सुमन केंद्रे यांनी मांडले. यावेळी स ग्रामस्थ, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.