मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर येथे पाय घसरून शेतकऱ्याचा मृत्यू

मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर येथे पाय घसरून शेतकऱ्याचा मृत्यू

------------------------------------------------------------------------------------

मंगळवेढा (पंढरी नगरी न्युज ) : मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर शेतकरी विहिरीतील पाण्याची मोटर चालू करण्यासाठी गेले असता ३८ वर्षीय शेतकरी पाय घसरून पडल्याने पाणी आत पडून मयत झाल्याची घटना घडली असून संजय आप्पासो पाटील असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

दरम्यान या घटनेची मंगळवेढा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलीस सूत्राकडून दिलेली माहिती अशी यातील मयत संजय पाटील हे दिनांक २८ रोजी लाईट आल्यानंतर रात्री अकरा वाजता विहिरीवरील मोटार पिकांना पाणी देण्यास सादर करण्यासाठी गेले होते.  मयताचा पाय घसरल्याने ते विहिरीत करून मयत झाले असल्याचे शेतकरी सचिन पाटील यांनी दिलेल्या खबर मध्ये म्हटले आहे.