प्रभागातील नागरिकांना नगरपरिषद मार्फत विविध लाभ मिळवून देणार

प्रभागातील नागरिकांना नगरपरिषद मार्फत विविध लाभ मिळवून देणार

____________________________________________________

सातारा प्रतिनिधी : प्रभागातील नागरिकासाठी नगरपरिषद मार्फत प्रत्येक घटका पर्यंत मिळणार्‍या कामाचा लाभ मिळण्यासाठी मा.नगरसेविका सौ. लिना गोरे व श्री राजू गोरे हे प्रभागात कार्य करतात :- श्री.लालासो (दादा) आवटे,अखिल भारतीय होलार समाज संघटना, अध्यक्ष सातारा सिटी

प्रभागातील ५ वर्षात अन्य विकासात्मक नवीन  अत्याधुनिक स्वच्छतागृह, समाज मदिर , रस्ते डांबरीकरण, बंदिस्त गटर, ओढ्यास संरक्षक भिंत बांधणे या कामा बरोबर आज होलार समाज्याच्या समाज हितासाठी सि.स नं ६५५ मंगळवार पेठ येथील होलार समाज मंदिरात कार्यक्रमासाठी जेवण बनवण्यासाठी लागणारी ताट,वाटी,ग्लास मोठी भाडी,खुर्च्या, सतरंजी व इतर साहित्य नगरसेविका सौ.लिना गोरे व राजू गोरे यांनी पाठपुराव्यातून सातारा नगरपरिषद मार्फत साहित्य वाटप करण्यात आले.

त्या प्रसंगी साहित्य ताब्यात घेताना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष होलार गल्ली श्री.प्रदिप गोळे,लालासो आवटे, ,अखिल भारतीय होलार समाज संघटना, अध्यक्ष सातारा सिटी , उपाध्यक्ष श्री. मगेश नामदास,.सुमित गवळी,युवराज करवले,भाऊ शिदे,श्रीमती शकुंतला शेलार, मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.व मंडळाच्या वतीने मा.नगरसेविका सौ.लिना गोरे,मा.सुर्यकांत उर्फ राजू गोरे याचे आभार व्यक्त करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.