सोलापुरात कांद्याने गाठले उंच शिखर, पहा आजचे कांदा बाजार भाव..!

सोलापुरात कांद्याने गाठले उंच शिखर, पहा आजचे कांदा बाजार भाव..!

___________________________________________________

दै.पंढरी- नगरी न्यूज : गेल्या काही दिवसांपासून सणासुदीचे दिवस चालू असल्यामूळे कांद्याची बाजारातील आवक बर्‍यापैकी कमी झाली आहे. यादरम्यान शेतकरी बाजारात कांदा पाहिजे त्या प्रमाणात आणत नव्हते. त्यामूळे सध्याच्या काळात कांद्याला चांगला दर प्राप्त होऊ लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोलापुरात कांद्याचा जास्तीत जास्त दर ४ हजारावर पोहोचला आहे. आता दिवसेंदिवस कांदा दर वाढीच्या बातम्या ऐकायला येत असल्यामूळे शेतकर्‍यांच्या आनंदात देखील भर पडली आहे.

मागील काही दिवसांपासून सोलापूर येथे कांद्याची आवक कमी झाली होती. जो काही कांदा बाजारात यायचा तो स्थानिक ठिकाणाहूनच यायचा. परिणामी मागणी तर वाढली पण कांद्याची पुरेपूर आवक नसल्या कारणाने सोलापूर येथील कांद्याच्या जास्तीत जास्त दरात वाढ झाली आहे…. याठिकाणी कमीत कमी दर १००, जास्तीत जास्त दर ४ हजार रुपये तर सर्वसाधारण दर १८०० मिळाला आहे.

कांद्याच्या दरात आता सगळीकडेच दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आज मुंबई येथील बाजारात ११२४४ क्विंटल एवढी आवक आलेली आहे. तर येथील कांद्याला जास्तीत जास्त दर ३४०० रुपये मिळाला आहे. कमीत कमी दर २४०० रुपये आहे तर सर्वसाधारण दर २९०० रुपये एवढा मिळाला आहे. येथील आजचा कमीत कमी दर आणि सर्वसाधारण दर २ हजाराच्या पुढेच आहे.

दि.१ नोव्हेंबर रोजी खेड चाकणच्या बाजारात किती आवक आली? किती दर मिळाला हे जाणून घेऊया. आज येथे ५५० क्विंटल एवढी आवक आलेली आहे. जास्तीत जास्त दर ३ हजार रुपये मिळाला आहे. कमीत कमी दर – १५०० रुपये तर सर्वसाधारण दर २२५० एवढा मिळाला आहे.

आज चंद्रपूर-गंजवड येथे देखील कांद्याचे कमीत कमी दर, जास्तीत जास्त दर तसेच सर्वसाधारण दर २ हजाराच्या पुढेच राहीले. येथील आजचा जास्तीत जास्त दर ३२०० रुपये आहे. कमीत कमी दर २ हजार तर सर्वसाधारण दर २५०० रुपये मिळाला आहे.