शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन!
------------------------------------------------------------------------------------
बार्शी( दै .पंढरी नगरी न्यूज): श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय बार्शी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालय मुलांच्या व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन ९ व १० नोव्हेंबर २०२२ रोजी करण्यात आले. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे जनरल सेक्रेटरी मा. श्री. पी टी. पाटील तर उदघाटक म्हणून संस्थेचे सहसचिव मा. श्री. ए पी देबडवार हे होते.
यावेळी माजी नगरसेवक तथा यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. अरुणदादा बारबोले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस एस गोरे, स्पर्धा सचिव प्रा. डॉ. एस एम लांडगे, डॉ.ए जी कांबळे, आयक्यूएसी समन्वयक डॉ.व्ही पी शिखरे उपस्थित होते. यावेळी संस्थेचे जनरल सेक्रेटरी मा. श्री. पी टी पाटील व सहसचिव मा.श्री. ए पी देबडवार यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एस गोरे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. या स्पर्धेत एकूण २४ संघांनी सहभाग नोंदवला.
समारोप कार्यक्रमात संस्थेचे खजिनदार मा. श्री. जयकुमार शितोळे यांनी सहभागी खेळाडूंना मार्गदर्शन केले. विजेत्या संघास कै. नलिनी देशमुख यांच्या स्मरणार्थ ट्रॉफी देण्यात आली.
या क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक संगमेश्वर कॉलेज सोलापूर यांनी पटकावला. आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज माढा संघ उपविजेता ठरला. तृतीय व चतुर्थ क्रमांक अनुक्रमे के बी पी महाविद्यालय, पंढरपूर व श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी यांनी संपादन केला.
स्पर्धा यशस्वीतेसाठी महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. एस एस गोरे, स्पर्धा सचिव प्रा. डॉ. एस एम लांडगे, प्रा. मकरंद भुजबळ, प्रा. राम नागटिळक, डॉ. मुस्ताक शेख, प्रा. नंदकुमार देशपांडे, प्रशांत बिराजदार, पंच म्हणून विविध शारीरिक शिक्षण संचालक तसेच क्रीडा मार्गदर्शक, बी पी एड व एम पी एड प्रशिक्षणार्थी यांनी योगदान दिले. प्रास्ताविक डॉ.ए जी कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. एस एस सुरवसे यांनी केले. आभार डॉ एस एस लांडगे यांनी मानले.